देवणीत शिवाजीराव माने जिल्हा प्रमूख नेतृत्वाखाली अनेकांचा शिवसेनेत प्रवेश - latur saptrang

Breaking

Tuesday, October 12, 2021

देवणीत शिवाजीराव माने जिल्हा प्रमूख नेतृत्वाखाली अनेकांचा शिवसेनेत प्रवेश



लातुर/ प्रतिनिधी
  देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात शिवसेनेच्या आढाव बैठकी मध्ये  बोरोळ व तसेच देवणी तालुक्यातील ऑटो रिक्षा चालकांचा अविनाश डब्बे, गणेश येणकुरे, संतोष बालुरे, उमाकांत सूर्यवंशी, किरण सूर्यवंशी, दत्ता डब्,बे परमेश्वर येणकुरे, अजय येणकुरे, बाबुराव थोटे, सतीश सूर्यवंशी बालाजी मोरे माधव खोपे ऑटो चालकांचा या बैठकीत शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला. व तसेच तालुक्यातील वाघदरी येथील सामाजिक कार्यकर्ते वाकसे किरण, दर्शन स्वामी ,आकाश हिंगडे,  इतर सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या कार्याला प्रेरित होऊन माननीय शिवाजीराव माने साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख लातूर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेने मध्ये जाहीर प्रवेश केला. धर्मवीर सर्व स्वर्गीय अनंद दिघे साहेबांच्या ठाणे  मुंबई येथील तत्कालीन शाखा प्रमुख बाबुराव शेंडगे बोरोळकर यांचा गौरव करण्यात आले. यावेळी मुंबई येथे 15 वर्षे शाखा प्रमुख म्हणून काम कर्ते वेळी धर्मवीर आनंद  दिघे तात्कालीन तालुकाप्रमुख जिल्हाप्रमुख ठाणे मुंबई यांच्यावर अनेक प्राणघातक हल्ल्याच्या प्रसंगाच्या वेळी आम्ही दिघे साहेबांच्या सोबत होतो त्यांच्यावरील काही हल्ले आम्ही कार्यकर्त्यांनी आमच्या अंगावर घेतले आजही माझ्या अंगावर, पाठीवर तलवारी  वार माझ्या अजूनही आहेत अशा कठिण परिस्थितीमध्ये आम्ही शिवसेनेत काम केले. मला गर्व आहे, मला अभिमान आहे  हिंदुरुदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब  यांच्या शिवसेनेत आहे. आणि अखंड आयुष्य शिवसेनेत राहू असे याप्रसंगी मुंबईमधील टोळी वार लोकांना मुंबई कसे वाचवले बाळासाहेबांनी बरेच असे प्रसंग डोळ्यांनी पाहिलेले ते स्वतः या बैठकीमध्ये सांगत होते. आज वयानी खचलो आहे पण मनाने आजही मी तरुण आहे अशी आम्हाला शिकवा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिली आहे मला याचा सार्थ अभिमान मरेपर्यंत राहील असे सत्कार प्रसंगी बोलताना बाबुराव शेंडगे बोरोळकर तात्कालीन शाखा प्रमुख ठाणे मुंबई बोलताना सांगितले. यांचा सत्कार यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच बरोबर देवणी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी अतिवृष्टीमुळे व मांजरा नदीच्या पुरात शेतातील काढणीस आलेल्या उभ्या पिकात पाणी शिरून उभे पीक100% बाधित होऊन शेतकऱ्यांचे पिक हात तोंडाशी येऊन गेला.  शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करून शिवसेना घरा घरा पर्यंत पोहचवण्याचे आदेश शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने साहेब यांनी दिले. या प्रसंगी देवणी तालुका प्रमुख पंडित अण्णा भंडारे, निलंगा तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, तालुकाप्रमुख बाबुराव शेळके, माजी नगरसेवक सतीश देशमुख, देवणी महिला आघाडी तालुका प्रमुख सुवर्णाताई शेंडगे, माजी तालुका उप प्रमुख नितीन देशमुख, मुकेश सुडे, लक्ष्मण बिरादार व देवणी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment