सामुहिक विवाह सोहळा लोकसेवेसाठी की मंत्रीपदासाठी ?
औसा :- औसा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार हे भाजपात महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्या नंतर मुस्लिम समाजाचे सर्वाधिक मतदान घेणारे कर्तबगार,धडपडे औसा मतदार संघासाठी लातूर जिल्ह्यात सर्वात जास्त निधी आणणारे लोकप्रतिनिधी आहेत.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे स्वीयसहाय्यक असल्यापासून आमदार अभिमन्यू पवार हे लोकसेवा कब्रस्त शेतकरी वधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा आणि तिथेच स्वतःच्या पुत्राचा विवाहाची घालमेल करून सत्ताधारी विरोधी लोकप्रतिनिधीला एकाच मंडपात आणून जादुई उत्सव साजरा केला पण आमदार अभिमन्यू पवार यांनी लोकसेवा म्हणून सामुदायिक विवाह सोहळा साजरा केला की उद्याच्या विस्तारित मंत्रिमंडळात आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना शह देण्यासाठी स्वतःला मंत्रिपद मिळाले म्हणून हा उत्सव साजरा केला?अशी उलट सुलट चर्चा होताना दिसते आहे. भाजप नेते,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना सर्व काही समजून तसे दाखवायचे आणि लातूर जिल्हा भाजपाच्या राजकारणात आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात एक फळी निर्माण करून त्यांच्याच विरोधात दंड थोपटायचे हे काँग्रेसी धोरण आमदार पवारांना सोबत घेऊने राबवीत तर नाहीत ना? अशीही सर्व पक्षात कुजबूज होत असून जे केले ते चांगले केले. सामुदायिक विवाह सोहळ्याची भरभरून प्रसिद्धी मिळाली. सामुदायिक विवाह सोहळ्या आडून आ. अभिमन्यू पवार हे काय साध्य करून पाहत आहेत याबाबतीत ही तर्कवितर्क लढविले जात असल्याची चर्चा होताना दिसते आहे. येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की लातूर येथील येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.07 मे 2023 रोजी लातूरचे सुप्रसिद्ध ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या पावन भूमीत 31 जोडप्यांचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाला.या सर्वधर्मीय विवाह सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.दिलीपराव देशमुख उपस्थित होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मूळ संकल्पना मांडणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे व वर्तमान संकल्पना मांडणारे महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त मा.महेंद्र महाजन उपस्थित होते.
हा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा वधु वरांच्या रुढी,परंपरेनुसार संपन्न झाला.या 31 नववधू-वरांची भव्यदिव्य अशी वरात उक्का मैदान,गांधी चौकपासून गोलाई,सुभाष चौक, हत्तेचौक मार्गे सिद्धेश्वर मंदिरापर्यंत सनई चौघड्याच्या सुरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत काढण्यात आली.या वरातीत लातूर शहरातील विविध दिग्गज मान्यवर सहभागी झाले होते.यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रात्री ठिक 07:00 वाजता विवाह सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी सर्व समाजाचे धर्मगुरू उपस्थित होते, त्यांनी वधुवरांना शुभाशीर्वाद दिले.याची मीडिया ने साधी दखल घेतली नाही किंवा ते विवाह ऐतिहासीक ठरले नाहीत मात्र 25 जोडप्यांचे विवाह हे निश्चीतच ऐतिहासीक ठरतात यात नवल नव्हे काय ? - सौजन्य ,दै.महावृत्त
No comments:
Post a Comment