लातूर शहर महानगरपालिकेमार्फत शहरातील विविध ठिकाणाचे कचरा उचलण्याची कार्यवाही सुरू.
लातूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात आज दिनांक २४/११/२०२२ रोजी लातूर शहरातील रिंग रोड, सिध्देशवर चौक, सिध्देश्वर स्मशान भुमी, गंगाधाम, गांधी मार्केट पार्कींग, मजगे नगर, अदनान गल्ली, उद्योग भवन, गांधी चौक, एल.आय.सी कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज चौक पार्कींग, नाना-नानी पार्क येथील कच-याचे ढिगारे उचलून घेण्याची कार्यवाही करण्यांत आली आहे. तसेच प्रभाग क्रमांक १८ मधील गैर हजर ट्रक्टर व घंटागाड्याच्या जागी पर्यायी घंटागाड्या व ट्रक्टर देवून घनकचरा व्यवस्थापनाचे दैनंदिन काम सुरळीत चालु करण्यात आले आहे. दोन दिवसात शहरातील उर्वरीत शिल्लक कचरा उचलण्याची कार्यवाही पुर्ण करण्यात येत आहे.
--
No comments:
Post a Comment