मुंबई, दि. 10- भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आदींनी यावेळी राष्ट्रपतींचे स्वागत केले.
राष्ट्रपतींच्या हस्ते शुक्रवार दि. 11 फेब्रुवारी रोजी मुंबईतील राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उद्घाटन होणार आहे. तसेच दि. 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिर येथे भेट देतील.
०००००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/a9mbP6C
https://ift.tt/wX5Px9c
No comments:
Post a Comment