राष्ट्र सेवा दला तर्फे रांगोळी व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार संपन्न. - latur saptrang

Breaking

Thursday, February 10, 2022

राष्ट्र सेवा दला तर्फे रांगोळी व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार संपन्न.

 



राष्ट्र सेवा दला तर्फे रांगोळी व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार संपन्न.


मालेगाव - येथील राष्ट्र सेवा दल भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने दल सप्ताहांतर्गत रांगोळी व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. 

या स्पर्धांचा बक्षिस समारंभ संगमेश्वर येथील कर्मवीर या ना जाधव विद्यालय येथे पार पडला. या वेळी विचार पिठावर राष्ट्र सेवा दल मालेगाव महानगर जिल्हा कार्याध्यक्ष  विलास वडगे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एच. एन. मंडळ, निंबा संपत मोरे, श्रीमती आशालता महाजन, परीक्षक वैशाली भामरे, चेतना शिरुडे, सागर पवार आदी उपस्थित होते. 

मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र माऊली प. पू. साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वानी खरा तो एकचि धर्म ही प्रार्थना म्हटली. सेवा दल मंडळ सदस्य  स्वाती वाणी यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचा परिचय करून दिला. कविता मंडळ यांनी करून दिला. सर्व मान्यवरांना संविधान, दिनदर्शिका व संचित पुस्तिका भेट देऊन विलास वडगेंच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यानंतर परीक्षकांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा संघटक रविराज सोनार यांनी सुत्रसंचलन केले. बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन राज्य मंडळ सदस्य नचिकेत कोळपकर आणि तालुका संघटक सारंग पाठक यांनी केले.

 यावेळी निबंध स्पर्धा मोठा गटात  कु. लावण्या विलास लोधे प्रथम क्रमांक (1000 रु ) महात्मा गांधी यांचे नावे, स्वामी सोमनाथ डांगचे द्वितीय क्रमांक  (500 रु)  पंडित जवाहरलाल नेहरू नावे,   कु. मानसी कांतीलाल वायडे तृतीय क्रमांक ( 200 रु) नेताजी सुभाषचंद्र बोस नावे  

तसेच उत्तेजनार्थ  100 रु चे पारितोषिक कु. अनुष्का रवींद्र पवार,  कु. भूमी विजय चित्ते,  कु. संस्कृती सहदेव वरखेडे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर नावे  पारितोषिक देण्यात आले. लहान गटात कु. तन्वी जयेश मुसळे प्रथम क्रमांक ( 1000 रु ) महात्मा गांधी यांचे नावे, कु. जान्हवी संतोष वडगे द्वितीय क्रमांक ( 500 रु), पंडित जवाहरलाल नेहरू नावे, कु.पुर्वा विलास वाघ तृतीय क्रमांक ( 200 रु ) नेताजी सुभाषचंद्र बोस नावे,  तसेच उत्तेजनार्थ 100 रु चे बक्षीस कु. क्षितिजा रविराज सोनार, कु. जान्हवी संतोष डांगचे, पौर्णिमा किरण पाटील यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर नावे  देण्यात आले.             

निबंध स्पर्धेसाठी  शारदा चौधरी (मुंबई), महेंद्र नाकील (नासिक), निशा भोसले (सोलापूर), प्रशांत देशपांडे मुंबई, निलेश शिंगे (पुणे), बळवंत अहिरे (मालेगाव) यांनी प्रायोजकत्व दिले.

रांगोळी स्पर्धेत  प्रथम पारितोषिक 1500रू -  चे कु. आँचल प्रमोद मा़ळी* कै राम सोनवणे समरणार्थ  द्वितिय 1100 रू  चे -  भूमी निलेश अमृतकर, साथी विकास मंडळ सर यांच्या स्मरणार्थ तृतीय - 751रू  प्राची नितिन खैरनार* गं भा  शकुंतला निंबा मोरे यांच्या  स्मरणार्थ उत्तेजनार्थ स्मरणार्थ 4 बक्षिसे रु 300 ची  अंजली संजय थोरकर, मोनिका भास्कर मोरे, हर्षल सुनिल गुरव, प्रतिभा कारभारी त्रिभुवन यांना प्रदान करण्यात आले. मोठया गटात प्रथम क्रमांकाचे बक्षीस 2100 रू चे रितल उत्तम महाजन, साथी विकास मंडळ यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकाचे 1500 रू चे भाग्यश्री शाम पाटील कै त्र्यंबक महादू महाजन  सर यांच्या स्मरणार्थ, तृतीय क्रमांकाचे  1100 रूचे  ईशा रवींद्र बागुल कै त्र्यंबक महादू महाजन यांच्या स्मरणार्थ, चतुर्थ क्रमांक बक्षीस  700रू- चे संदीप रघुनाथ आव्हाडे  तसेच उत्तेजनार्थ 500 रु ची 3 बक्षिसे कै. राम प्रशांत सोनवणे याच्या स्मरणार्थ हेमराज पंडित निकम, जयेश नंदकिशोर सैंदाणे, दिशा दिलीप माळी, याना देण्यात आले तसेच विशेष प्रोत्साहन पर 1 बक्षिस रू 500/- चे  प्रशांत प्रमोद माळी यास देण्यात आले.

या स्पर्धेत साई आर्ट अँकँडमी, कर्म. या. ना. जाधव विद्यालय, झुं प. काकाणी कन्या विद्यालय, रूं झु. काकाणी विद्यालय, तसेच नविन प्राथमिक शाळा किल्ला, तक्षिला  इंग्लिश मिडीयम स्कुल, विद्या विकास इंटरनॅशनल स्कूल, ल. रा . काबरा विद्यालय मालेगांव या शाळांनी सहभाग नोंदवला. प्रकल्प प्रमुख म्हणून प्रवीण वाणी यांनी सहभाग नोंदवला. रांगोळी स्पर्धेसाठी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महापुरुष असा विषय देण्यात आला होता. सहभागी स्पर्धकांनी आकर्षक  व हुबेहूब असे महापुरुषांचे चित्र साकारले होते.

रांगोळी स्पर्धेसाठी प्रायोजकत्व  कविता मंडळ, प्रशांत सोनवणे,  निंबा मोरे, संजय भास्कर  जोशी, सागर पवार, आशालता महाजन, दिनेश निकम यांनी दिले.

सर्व यशस्वी स्पर्धकांना साथी ऋषिकेश राऊळ ( शारजा) यांचे तर्फे एक धैर्यशील योद्धा महात्मा गांधी विचारधन पुस्तिका भेट देण्यात आली. प्रमाणपत्रही देण्यात आले.

याच वेळी जेष्ठ कार्यकर्ते अशोक पठाडे यांचा सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेच्या शालेय समिती चेअरमन पदी निवड झाले बद्दल  सत्कार करण्यात आला‌ अध्यक्षीय भाषणात विलास वडगे यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोषाध्यक्ष राजेंद्र दिघे, राजीव वडगे, अनिल महाजन, बळवंत आहिरे, अशोक पठाडे, प्रवीण वाणी, अमिर, महेश बच्छाव, पायल चौधरी, हर्षल बोरा, प्रांजलीआहिरे तसेच

आणि बाल सेवा दल सैनिक यांनी प्रयत्न केले. गीता जोशी यांनी आभार मानले. राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपला.

No comments:

Post a Comment