India at UN: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतानं रशियाविरुद्ध मतदान टाळलं - latur saptrang

Breaking

Saturday, February 26, 2022

India at UN: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतानं रशियाविरुद्ध मतदान टाळलं

 नवी दिल्ली :

रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान, ज्या क्षणाकडे अनेक देशांचं लक्ष लागून होतं तो क्षण अखेर आला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला अमेरिका किंवा रशिया या दोघांपैंकी एकाच्या बाजुनं उभं राहण्याची वेळ आली. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाविरोधात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ठराव मांडण्यात आला. यावर सर्व देशांना मतदान करावं लागणार होतं. यावेळी, भारतामध्ये अत्यंत धोरणीपणा दाखवत रशियाच्या हल्ल्याचा निषेध केला, परंतु मतदान टाळलं. भारतासोबच मतदानापासून दूर राहणाऱ्या देशांमध्ये चीन आणि यूएई या देशांचाही समावेश आहे.

युक्रेन संघर्षाच्या निमित्तानं जगातील दोन महासत्ता अमेरिका आणि रशिया एकमेकांसमोर उभ्या ठाकल्यात. एकीकडे अमेरिका हा भारताचा राजनैतिक भागीदारी मित्र देश आहे, तर दुसरीकडे वर्षानुवर्षे खंबीर मित्राची भूमिका बजावत असलेला रशिया आहे.

संयुक्त राष्ट्रासमोर भारताची भूमिका 

संयुक्त राष्ट्रासमोर भारताचे स्थायी प्रतिनिधी टी एस तिरुमूर्ती यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. 'सर्व सदस्य देशांनी रचनात्मक पद्धतीने पुढे वाटचाल करण्यासाठी तत्त्वांचा आदर करणं आवश्यक आहे. याक्षणी हे कितीही कठीण वाटत असलं तरी 'संवाद' हाच मतभेद आणि वाद सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे. मुत्सद्देगिरीचा मार्ग बाजुला सारणं ही खेदाची गोष्ट आहे. आपल्याला याच मार्गाकडे परत यावं लागेल. या सर्व कारणांमुळेच भारतानं या प्रस्तावापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे' असं म्हणत तिरुमूर्ती यांनी संयुक्त राष्ट्रासमोर ठामपणे भारताची भूमिका मांडली.

युक्रेन हल्ल्याबद्दल व्यक्त केली चिंता

'युक्रेनमधील सद्य घडामोडींमुळे भारत चिंतेत आहे. हिंसा आणि शत्रुत्व ताबडतोब संपुष्टात आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जावेत, अशी आमची विनंती आहे. मानवी जीवनाच्या किंमतीवर कोणत्याही प्रश्नावर तोडगा काढला जाऊ शकत नाही. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसहीत भारतीय समुदायाच्या कल्याण आणि सुरक्षेबाबतही आम्ही चिंतित आहोत, असंही तिरुमूर्ती यांनी यावेळी म्हटलं. 

इतर देशांची भूमिका?

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत, चीन आणि यूएई या देशांनी मतदानावर बहिष्कार टाकला. रशियाच्या संयुक्त राष्ट्रदूतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मसुदा ठराव हा 'रशियाविरोधी' असल्याचं म्हटलं. तर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, नॉर्वे, आयर्लंड, अल्बेनिया, गॅबॉन, मेक्सिको, ब्राझील, घाना आणि केनिया या देशांनी रशियाविरोधात मांडल्या गेलेल्या  संयुक्त राष्ट्रासमोर भारताचे स्थायी प्रतिनिधी टी एस तिरुमूर्ती यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. 'सर्व सदस्य देशांनी रचनात्मक पद्धतीने पुढे वाटचाल करण्यासाठी तत्त्वांचा आदर करणं आवश्यक आहे. याक्षणी हे कितीही कठीण वाटत असलं तरी 'संवाद' हाच मतभेद आणि वाद सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे. मुत्सद्देगिरीचा मार्ग बाजुला सारणं ही खेदाची गोष्ट आहे. आपल्याला याच मार्गाकडे परत यावं लागेल. या सर्व कारणांमुळेच भारतानं या प्रस्तावापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे' असं म्हणत तिरुमूर्ती यांनी संयुक्त राष्ट्रासमोर ठामपणे भारताची भूमिका मांडली.

युक्रेन हल्ल्याबद्दल व्यक्त केली चिंता

'युक्रेनमधील सद्य घडामोडींमुळे भारत चिंतेत आहे. हिंसा आणि शत्रुत्व ताबडतोब संपुष्टात आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जावेत, अशी आमची विनंती आहे. मानवी जीवनाच्या किंमतीवर कोणत्याही प्रश्नावर तोडगा काढला जाऊ शकत नाही. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसहीत भारतीय समुदायाच्या कल्याण आणि सुरक्षेबाबतही आम्ही चिंतित आहोत, असंही तिरुमूर्ती यांनी यावेळी म्हटलं. 

इतर देशांची भूमिका?

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत, चीन आणि यूएई या देशांनी मतदानावर बहिष्कार टाकला. रशियाच्या संयुक्त राष्ट्रदूतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मसुदा ठराव हा 'रशियाविरोधी' असल्याचं म्हटलं. तर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, नॉर्वे, आयर्लंड, अल्बेनिया, गॅबॉन, मेक्सिको, ब्राझील, घाना आणि केनिया या देशांनी रशियाविरोधात मांडल्या गेलेल्या ठरावाला मंजुरी दिली.

No comments:

Post a Comment