चौथ्या लाटेत 'स्टिल्थ ओमायक्रॉन'चा उद्रेक, किती गंभीर आहे नवा व्हेरिएंट? वाचा सविस्तर
वृत्तसंस्था, सोल : चीनमध्ये करोनाच्या 'स्टिल्थ ओमायक्रॉन' या नव्या विषाणूचा संसर्ग वाढला आहे. चीनच्या काही प्रांतांसह हाँगकाँगमध्येही मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ झाली आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे हा संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण आहे.
चीनमध्ये लॉकडाऊन, भारताला अलर्ट; करोना पुन्हा उंबरठ्यावर
चीनमधील करोनाच्या नव्या उद्रेकाबद्दल...
- 'स्टिल्थ ओमायक्रॉन' हा करोनाचा कोणताही नवा प्रकार नसून, 'बी. ए. २'चे विस्तारित रूप आहे. याच प्रकारामुळे करोनाची तिसरी लाट आली होती. त्यातील काही बदलांमुळे त्याला 'स्टिल्थ ओमायक्रॉन' असे नाव दिले आहे.
स्टेंटेस इन्स्टिट्यूटच्या संशोधनानुसार 'स्टिल्थ ओमायक्रॉन' हा 'सार्स कोव्हिड'च्या ओमायक्रॉनच्या मूळ विषाणूपेक्षा जास्त वेगाने संक्रमित होऊ शकतो. 'बी. ए. २' पेक्षा त्याचा संक्रमणाचा कालावधी कमी आहे.
जानेवारी महिन्यात सायप्रस येथील शास्त्रज्ञांनी 'स्टिल्थ ओमायक्रॉन'संदर्भात माहिती दिली होती. सायप्रसचे वैज्ञानिक डॉ. लियोनडिओस कोस्त्रिकिस यांनी ही माहिती दिली होती. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील करोना विषाणूत बदल होणार असल्याचे म्हटले होते.
चीनमधील सद्यस्थिती
चीनमधील सद्यस्थिती
चीनच्या जिलिन आणि शेन्झेनसह काही शहरांमध्ये करोनाच्या नव्या प्रकाराचे रुग्ण आढळल्याचे वृत्त आहे.
- करोनाचे रुग्ण वाढल्याने या भागात लॉकडाउन लावण्यात आला आहे.
- करोनाचे रुग्ण वाढल्याने या भागात लॉकडाउन लावण्यात आला आहे.
- शांघाय येथून निघणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर २१ मार्चपासून निर्बंध लादण्यात येणार आहेत.
- चीनच्या आरोग्य विभागाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील करोनारुग्णसंख्या २४ तासांत ३५०७ नोंदविण्यात आली. त्यापूर्वीच्या २४ तासांमध्ये ती १,३३७ होती.
- चीनच्या आरोग्य विभागाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील करोनारुग्णसंख्या २४ तासांत ३५०७ नोंदविण्यात आली. त्यापूर्वीच्या २४ तासांमध्ये ती १,३३७ होती.
बहुतांश रुग्ण चीनच्या जिलिन प्रांतामध्ये नोंदविण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment