मुंबई, दि. 15 : कोरोना काळात थोडीशीही उसंत न घेता लोकाभिमुख निर्णय घेत तसेच सामान्य जनतेला मदतीचा हात देत शासनाने आपली जनसेवेची दोन वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित चित्रमय प्रदर्शनाचे आयोजन मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात केले आहे. या प्रदर्शनास ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी भेट दिली. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) गणेश रामदासी, संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे, उपसंचालक श्रीमती सीमा रनाळकर आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनात मुख्य आकर्षणाचे केंद्र असलेल्या 360 डिग्री सेल्फी पॉईंट येथे ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी मोठ्या उत्साहाने व्हिडिओ शूट करून घेतला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आयोजित केलेले प्रदर्शन म्हणजे शासनाने केलेल्या कामकाजाचे प्रतिबिंब आहे, अशा शब्दात ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या प्रदर्शनात ऊर्जा विभागाने केलेली ‘ऊर्जा’मय कामगिरी दर्शविण्यात आली असून शासनाचे कृषी पंप वीज जोडणी धोरण तसेच सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीची माहितीही प्रदर्शित करण्यात आली आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/tMGImz5
https://ift.tt/tV9mwsp
No comments:
Post a Comment