मुंबई, दि. 15 : मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणातील राज्याच्या दोन वर्षांच्या प्रगतीचे दर्शन फारच प्रभावी पद्धतीने साकार झाले आहे, अशा शब्दात उद्योग, खनिकर्म तथा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी कौतुक केले आहे. राज्य शासनाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कालावधीत विविध विभागांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारे ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन मंत्रालयात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आज त्यांनी भेट दिल्यानंतर अभिप्राय दिला आहे. यावेळी माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे संचालक गणेश रामदासी, दयानंद कांबळे आदी उपस्थित होते.
राज्याने सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी केली. कोविडसारख्या जागतिक संकटाच्या काळातही महाराष्ट्र थांबला नाही. उद्योग विभागाच्या प्रयत्नाने या काळातही राज्यात सुमारे चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. तीन लाखांहुन अधिक रोजगार निर्मिती झाली आहे. ऑक्सिजन निर्मितीचे धोरण तयार करुन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता वाढविली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु केला आहे. राज्यात सर्व मंडळाच्या शाळांमधून मराठी भाषा शिकविणे अनिवार्य केले आहे. लवकरच मुंबईत मराठी भाषा भवन उभे राहणार आहे. या सर्व विषयांची माहिती या चित्र प्रदर्शनातून दर्शविण्यात आली आहे
राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या कामगिरीचा एकत्रित आढावा घेणारे हे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधणारे ठरले आहे. आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर वरिष्ठ मंत्री, राज्यमंत्री, यांनीही या प्रदर्शनास भेट देऊन या संकल्पनेचे कौतुक केले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अभ्यागतांसाठी अधिवेशन कालावधीपर्यंत खुले असणार आहे.
उद्योगमंत्र्यांनी घेतला फिरता ३६० डिग्री सेल्फी
तरुणांना लाजवेल अशा उत्साहात उद्योगमंत्री श्री. देसाई हे काम करीत असतात. त्यांनी प्रदर्शनाचे अवलोकन केल्यानंतर इथे उपलब्ध असलेला फिरता ३६० डिग्री सेल्फीही घेतला. हातात अभिजात मराठी भाषेच्या प्रसिद्धीचे फलक घेऊन येथे व्हिडिओ सेल्फी काढला.
प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवरील प्रदर्शन पॅनल यांचा एकत्रित अनुभव घेता यावा यादृष्टीने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण फिरता ३६० डिग्री सेल्फी पॉईंट येथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला आकर्षून घेत आहे. आतापर्यंत शेकडो लोकांनी हातात फलक घेऊन सेल्फी काढून ती समाज माध्यमांवर टाकली आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/LdTMSG4
https://ift.tt/t8mBDpc
No comments:
Post a Comment