संभाजीराजेंचा गेम झाला, गेम कुणी केला हे त्यांना चांगलंच माहितीये : शिवेंद्रराजे भोसले - latur saptrang

Breaking

Friday, May 27, 2022

संभाजीराजेंचा गेम झाला, गेम कुणी केला हे त्यांना चांगलंच माहितीये : शिवेंद्रराजे भोसले







 सातारा : "छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच माघार घ्यावी लागली. मला तर वाटतंय त्यांचा गेम झाला. त्यांचा गेम कुणी केला, हे संभाजीराजेंना चांगलंच माहिती आहे", असं वक्तव्य भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलंय. छत्रपती घराण्यातील वंशजाचा महाविकास आघाडीने सन्मान राखायला हवा होता, असंही शिवेंद्रराजे म्हणाले.


राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी अखेर या लढाईतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. यावेळी संभाजीराजे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला. झालं ते बरं झालं, आता मी महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी मोकळा आहे. स्वराज्य संघटना बांधण्यासाठी आता राज्यभर फिरणार असल्याचं यावेळी त्यांनी आवर्जून सांगितलं.

संभाजीराजेंच्या माघारीनंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच भाजप खासदार शिवेंद्रराजे भोसले यांनी संभाजीराजेंचा गेम झाल्याचं मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले, "संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच माघार घ्यावी लागली. मला तर वाटतंय त्यांचा गेम झाला. त्यांचा गेम कुणी केला, हे संभाजीराजेंना चांगलंच माहिती आहे".

"संभाजीराजेंच्या पाठीमागे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज उभा आहे. त्यांच्या गडकिल्ले संवर्धनाचं काम, मराठा आरक्षण लढाईत त्यांचं योगदान अमुल्य आहे. अशावेळी छत्रपती घराण्यातील वंशजाचा महाविकास आघाडीने सन्मान राखायला हवा होता", अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.

संभाजीराजेंची माघार

राज्यसभा निवडणूक लढवणार नाही, असं आजच्या पत्रकार परिषदेत सांगत छत्रपतींनी गेल्या १० दिवासांच्या नाट्यमय घडामोडींवर पडदा टाकला. मी राज्यभर दौरा करणार असून मला माझी ताकद पाहायची आहे. आता स्वराज्य संघटनेच्या बांधणीकरिता मी राज्य पिंजून काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment