दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Wednesday, July 6, 2022

दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी

 दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी


(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका  क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk 


😎 झटका देणारी बातमी; घरगुती गॅस सिलेंडर दरात मोठी वाढ :


इंधन कंपन्यांनी घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडर दराने एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत आता घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1052.50 रुपये मोजावे लागणार आहेत. महागाईने आधीच सर्वसामान्यांचे बजेट बिघडले असताना त्यात आता एलपीजी गॅस दरवाढीची भर पडली आहे.  


📍 पीएम किसान निधीसंदर्भात मोठी बातमी :


पीएम किसान सन्मान निधीसंदर्भात महत्वाचे अपडेट आले आहे. आता लाभार्थी शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. या हप्त्याचे पैसे ऑगस्‍ट ते सप्टेंबरदरम्यान ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. कृष‍ी मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा 12 वा हप्ता 1 सप्टेंबरला देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे.  तर दुसरीकडे, सरकारच्या वतीने ई-केवायसी करण्याची अंत‍िम तारीख वाढवून 31 जुलै करण्यात आली आहे.


💁‍♂️ शिंदे गटातील आमदार राज ठाकरेंच्या भेटीला :


शिवसेनेत नाराज असलेले आमदार बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता थेट राज ठाकरेंच्याही भेटीगाठी घेऊ लागले आहेत.  उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेले दादरचे आमदार सदा सरवणकर आज सकाळी 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. भेटीचं कारण अद्याप कळू शकलेलं नसलं तरी या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


💥 नाशिकमध्ये अफगाणी सुफी धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या :


नाशिक येथील येवला तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. येवला तालुक्यातील चिंचाेडी एमआयडीसी परीसरात काल राञी आठ वाजेच्या सुमारास एका अफगाण सुपी सय्यद नांवाच्या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीनी गाेळ्या झाडुन हत्या केल्याची घटना घडली आहे. ही हत्या आर्थिक वादातून झाली असून यामध्ये मृत व्यक्तीच्या ड्रायव्हरचा सहभाग आढळून आला आहे. नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी याबाबत माहिती दिली. 


🏥 लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर :


आरजेडी नेते लालू प्रसाद यादव  यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज संध्याकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी एअर अ‍ॅम्ब्युलन्सनं त्यांना दिल्लीला नेण्यात येणार आहे. त्यापूर्वी लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आज दिल्लीत जाऊन संपूर्ण व्यवस्था पाहणार आहे. लालू यादव सध्या पाटण्यातील पारस रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. 


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून  जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment