दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Thursday, July 7, 2022

दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी

  दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी


(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका  क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk 






👍 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला :


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच मंत्रालयात पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री कार्यालयातील दालनात दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी पदभार स्वीकारण्याआधी समर्थक आमदारांकडून पुष्पगुच्छ देऊन मंत्रालयात स्वागत करण्यात येत होते. पूजा केल्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला.


😎 उद्धव ठाकरे गटातील गळती सुरूच... :


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरातील 66 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. या नगरसेवकांमध्ये ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांचाही सामावेश आहे. ठाण्यातील नगरसेवकांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंना आणखी धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता शिवसेनेचे खासदार देखील एकनाथ शिंदे गटाला समिल होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.


🗣️ संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला :


शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज बंडखोर आमदारांना चांगलीच टोलेबाजी केली. जेव्हा आमदारांनी मुंबईतून पलायन केलं त्यावेळी पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की, हिंदुत्व अडचणीत आलंय त्यामुळं आम्ही गेलोय. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निधी देत नव्हता. तिसऱ्या दिवशी हे म्हणाले की, पक्षातील काही लोकं हस्तक्षेप करत होते, म्हणून आम्ही बाहेर पडलो. आता चौथ्या वेळेला ते माझं नाव घेत आहेत. त्यांनी एक ठरवावं. नेमकं ते का बाहेर पडलेत यासाठी त्यांनी कार्यशाळा घ्यायला हवी, असंही राऊत म्हणाले. 


🤩 गृहनिर्माण सोसायट्यांना सरकारचा मोठा दिलासा :


भाजपा- शिवसेना युतीचे सरकार येताच गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा देण्यात आला असून सोसायटीच्या निवडणूक खर्चात मोठी कपात करण्यात आली आहे. सहकार विभागाने महाराष्ट्र सहकारी संस्था उपविधी 1960 कलम 73 खंड B&C (11) मधील बदलांनुसार 250 पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवडणूका घेण्यासाठी 340 शासनमान्य व्यक्तींच्या पॅनेलमधून निवडणूक निरीक्षक नियुक्त करुन निवडणूका करण्याचे निर्देश शासनाने दिले होते.


🏥 लालूंची प्रकृती नाजूक, शरीराची हालचाल बंद :


राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती नाजूक झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांना पाटण्याहून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. येथे त्यांची प्रकृती नाजूक बनली आहे. त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी सांगितले -'त्यांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी केली जाील. त्यानंतर उपचार सुरू केले जातील. सद्यस्थितीत त्यांच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नाही.'


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment