राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात - latur saptrang

Breaking

Monday, August 8, 2022

राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

मुंबई, दि. ८ : राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१,राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १२ तुकड्या तैनात आहेत.

नांदेड- १, गडचिरोली- १ अशा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ)  एकूण दोन तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानाची सद्यस्थिती

राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३१६ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११८ नागरिकांनी  आपला जीव गमावला आहे तर २३१ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ८६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज  सकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात  येत आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/vnXkmiA
https://ift.tt/84VA1SQ

No comments:

Post a Comment