राज्य कला प्रदर्शनासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत कलाकृती सादर करण्याचे आवाहन - latur saptrang

Breaking

Friday, November 4, 2022

राज्य कला प्रदर्शनासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत कलाकृती सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 4 :- 62 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या कलावंतांकडून ऑनलाईन कलाकृती मागविण्यात येत आहेत.

या प्रदर्शात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांप्रमाणे एकूण 15 पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक कलावंतांनी दि. 07 ते 22 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत कला संचालनालयाच्या www.doa.maharashtra.gov.in या संकेतस्थाळावर ऑनलाईन स्वरुपात कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन प्र.कला संचालक, कला संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/4.11.2022



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/9DVMSRj
https://ift.tt/fXNVZ2w

No comments:

Post a Comment