दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Monday, August 8, 2022

दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी

 दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी


(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका  क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk   




👍 शिंदे -फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या :


उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, शपथविधीदेखील होणार आहे. राजभवनावर सकाळी हा शपथविधी होणार आहे.. मंत्रिमंडळ विस्तारानंतर 10 ते 17 ऑगस्ट राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन बोलवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. त्यांना आज सायंकाळपर्यंत मुंबईत येण्याचे निरोप मिळणार आहे.


📍 संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी :


शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना आज पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मागील काही दिवसांपासून ते ईडी (सक्तवसुली संचालनालय) कोठडीत होते. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली होती.


🗣️ टीईटी घोटाळा, अब्दुल सत्तार यांचं स्पष्टीकरण :


टीईटी अपात्र यादीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 3 मुली आणि एका मुलाचं नावं असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. उजमा, हुमा, हीना अशी मुलींची नावं आहेत तर अमीर सत्तार असं मुलाचं नाव आहे. या चारही जणांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द झालंय. 'पण, माझ्या मुलानं परीक्षा दिलीच नाही मग अपात्र यादीच नावच आलं कसं?' असा सवाल अब्दुल सत्तार उपस्थित केला. तर मुली परीक्षेत नापास झाल्या होत्या, आमच्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचं सत्तारांनी म्हटलं.


🚨 भंडाऱ्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणी 3 पोलिसांचं निलंबन :


भंडाऱ्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणी तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. भंडाऱ्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेवर दुसऱ्यांदा झालेला बलात्कार हा पोलिसांच्या बेफिकीरीनं झाल्याचा आरोप केला जात आहे. 


🥇 बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला सुवर्ण :


कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं मिशेल लीविरुद्ध 21-15, 21-13 असा विजय मिळवत भारताच्या झोळीत आणखी एक सुवर्णपदक घातलंय. कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं 19 वं सुवर्णपदक आहे. तर, भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 56 पदकं जिंकली आहेत. ज्यात 15 रौप्यपदक आणि 22 कांस्यपदकांचा समावेश आहे. 


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून latursaptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment