राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग कल्याण ध्वजनिधी संकलन मोहिमेचा शुभारंभ - latur saptrang

Breaking

Friday, October 7, 2022

राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग कल्याण ध्वजनिधी संकलन मोहिमेचा शुभारंभ

मुंबई, दि. 7 : ‘नॅब’ ही संस्था दृष्टिबाधित, बहुविकलांग व्यक्तींना रोजगार प्रशिक्षण देण्याचे तसेच दिव्यांग मुलामुलींना शिक्षण उपलब्ध करून देण्याचे पुण्यकार्य करीत आहे. ‘नॅब’ संस्थेच्या समस्यांबाबत आपण शासनस्तरावर बैठकीचे आयोजन करून समस्यांचे निराकरण करू, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.

‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ (नॅब ) संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्यावतीने आयोजित दिव्यांग कल्याण ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा आरंभ राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.7) राजभवन येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

‘नॅब’ संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या विद्यार्थिनी वसतिगृहातील दृष्टिबाधित विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी शासनाकडून मिळत असलेले योगदान संस्थेतील सर्व मुलींना मिळावे तसेच संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या बी. एड. अभ्यासक्रमाला पुनश्च विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता मिळावी, अशी अपेक्षा नॅब महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला नॅब महाराष्ट्रचे मानद सचिव गोपी मयूर, कोषाध्यक्ष विनोद जाजू, दिव्यांग उद्योजक भावेश भाटिया, नॅबचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मंगला कलंत्री आदी उपस्थित होते.

 

Governor launches Flag Fund Collection Drive for Divyang welfare

 

Mumbai, 7th Oct : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari launched the Flag Day Fund Collection Drive for the welfare of Visually Impaired Divyangs at Raj Bhavan Mumbai on Friday (7 Oct).

The Flag Day programme was organised by the Maharashtra Chapter of the National Association for the Blind, an organisation working for the education, training and rehabilitation of the visually impaired Divyang persons and children.

Applauding the good work done by NAB Maharashtra, the Governor assured that he will take up all pending issues of NAB with the government.

President of NAB Maharashtra Rameshwar Kalantri briefed the Governor about the various problems faced by NAB for the education of visually impaired girls and the training of persons with multiple disabilities.

Honorary General Secretary of NAB Gopi Mayur, treasurer CA Vinod Jaju, Joint Secretary and Divyang entrepreneur Bhavesh Bhatia, Mukteshwar Munshettiwar, Mangala Kalantri and others were present.

0000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/JCMexID
https://ift.tt/Zv7Y5ex

No comments:

Post a Comment