लातूर ः काल लातूर शहरातील राहुलनगर भागात झालेल्या प्रकारावरून लातूरचे महपौर विक्रांत गोजगुंडे यांच्यासह 04 जणांविरूद्ध लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यात अनुसूचीत जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी) व अन्य कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महापौर विक्रांत गोजमगुंडे हे काल आपला प्रभाग असलेल्या राहुल नगर परिसरात कार्यकर्त्यांसह गेले होते. या दरम्यान त्यांनी व त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी प्रभागातील नागरीकांना शिवीगाळ केली. धक्काबुक्की केली, दमदाटी केली. त्यांच्यासोबतच्या एका कार्यकर्त्याने दगड मारून जखमी केले, अशी ङ्गिर्याद बबलु मधुकर गवळे रा. गौरीशंकर सोसायटी लातूर यांनी ङ्गिर्याद दिल्यावरून आज पहाटे 2.37 वाजता महापौर विक्रांत गोजगुंडे, ईब्या अक्रम बोरीकर, जमीर शेख, अक्रम बोरीकर, खाजाभाई शेख व इतर 10 अशा 15 जणांविरूद्ध भादंवि कलम 143, 147, 149, 323, 324, 336, 504, 506 व अॅट्रॉसिटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे यांनी हा गुन्हा दाखल करून घेतला आहे. घटनास्थळास लातूर शहर पोलीस उपअधीक्षकजितेंद्र जगदाळे, गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांनी भेट दिली आहे. या गुन्ह्याचा तपास शहर पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे हे करीत आहेत. काल दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास प्रभागात महापौर व त्यांच्या साथीदारांनी येऊन शिवीगाळ, धक्काबुक्की व दमदाटी केली असे या तक्रारीत नोंद केली आहे. महापौर यांच्या समवेत आलेले जमीर शेख यांनी दगड ङ्गेकून बबलू गवळे यांना जखमी केल्याचे म्हटले आहे. इतर ईब्या बोरीकर याने जातीवाचक बोलून अपमानीत केले असे तक्रारीत म्हटले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment