कोण होणार गुजरातचा मुख्यमंत्री? शर्यतीत आहेत 'ही' ५ नावं - latur saptrang

Breaking

Sunday, September 12, 2021

कोण होणार गुजरातचा मुख्यमंत्री? शर्यतीत आहेत 'ही' ५ नावं



 नवी दिल्लीः विजय रुपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री कोण याची जोरदार चर्चा सुरू आहे. गुजरात भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक होत आहे. या बैठकीत भाजपचा नेता म्हणजेच मुख्यमंत्री निवडला जाणार आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्या नावांचा विचार केला जात आहे. हे दोघेही पटेल किंवा पाटीदार समाजाचे आहेत. याशिवाय गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि राज्याचे कृषिमंत्री आर. सी. फालदू हेही पटेल समाजातील आहेत. यांची नावंही विजय रुपाणी यांचे उत्तराधिकारी म्हणून चर्चेत आहेत.

मनसुख मांडवीय

मनसुख मांडवीय हे केंद्रीय आरोग्यमंत्री आहेत. जुलैमध्ये राज्यमंत्रीपदावरून त्यांची कॅबिनेटपदी पदोन्नती केली गेली. आरोग्य विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली गेली. २०१६ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागली होती. २०१२ मध्ये ते राज्यसभेवर गेले होते. याशिवाय २०१८ मध्ये पुन्हा ते राज्यसभेवर निवडले गेले.

राज्यशास्त्रात पदवी घेतलेले मांडवीय हे पदयात्रेसाठी ओळखले जातात. २००२ मध्ये सर्वात कमी २८ वर्षांच्या वयात ते आमदार झाले. आमदार झाल्यानंतर त्यांनी १२३ किमी लांब पहिली पदयात्रा केली. यादरम्यान मांडवीय यांनी मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करत ४५ गावांची पदयात्रा केली होती. दुसऱ्यावेळी त्यांनी २००७ मध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि व्यसनमुक्ती अशी घोषणा देत ५२ गावांमध्ये १२७ किलोमीटरची पदयात्रा केली होती.
मांडवीय पटेल सामाजातील आहे. ते सौरष्ट्रमधील भावनगर जिल्ह्यातल्या पलिताना तालुक्यातल्या हनोल गावाचे रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंब शेती करतं. मध्यम वर्गीय कुटुंबातून ते आले आहेत. २०११ मध्ये नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना मांडवीय हे गुजरातच्या कृषी उद्योग महामंडळाचे अध्यक्ष होते.

पुरुषोत्तम रुपाला

रुपाला यांनाही जुलैमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलात पदोन्नती दिली गेली आणि त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. ते आधी कृषी राज्यमंत्री होते. आता ते केंद्रीय मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री आहेत. ६६ वर्षांचे रुपाला हे पाटीदार समाजातून येतात. १९८० च्या दशकात भाजपमधून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. १९९१ मध्ये ते अमरेली विधानसभेतून आमदार झाले. ते तीन वेळा इथून आमदार झाले.

राजकारणात येण्यापूर्वी रुपाला हे हायस्कूलचे प्राचार्य होते. त्यांनी सौराष्ट्र विद्यापीठात १९७६ ला बीएसी आणि गुजरात विद्यापीठात १९७७ ला बीएड केले. ते २०१६ मध्ये राज्यसभेचे खासदार होते. गुजरातच्या अमरेलीमधील ईश्वरिया गावात त्यांचा १ ऑक्टोबर १९५४ मध्ये जन्म झाला. रूपाला यांनी शेती केली आहे. २०१४ मध्ये गुजरातमध्ये नरेंद्र मोदींचे उत्तराधिकारी म्हणून रुपाला यांचे नाव पुढे आले होते.


नितीन पटेल

कट्टर हिंदुत्व अशी प्रतिमा असलेले ६५ वर्षीय नितीन पटेल हे ५ ऑगस्ट २०१६ पासून गुजरातचे उपमुख्यमंत्री आहेत. ५ वर्षांपूर्वी त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पटेल हे मेहसाणा जिल्ह्यातील आहेत. ते किशोर वयापासून राजकारणात सक्रिय होते. पटेल हे कडवा पाटीदार-पटेल समाजातील आहेत. १९७७ मध्ये त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली. १९९० मध्ये ते पहिल्यांदाच आमदार झाला. यानंतर १९९५ मध्ये ते पहिल्यांदा गुजरातचे कॅबिनेट मंत्री झाले आणि त्यांना आरोग्यमंत्री पद मिळाले. पटेल यांनी बीकॉम सोडून कुटुंबाचा व्यवसाय सांभाळला होता.

https://latursaptrangnews.blogspot.com/2021/09/blog-post_19.html?m=1

No comments:

Post a Comment