मुंबई, दि. १७ – प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या 136 व्या जयंती निमित्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव इंद्रा मालू यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
आज मंत्रालय येथे प्रबोधनकार ठाकरे यांच्या 136 व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी 74व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी आमदार सुनील प्रभू, आमदार प्रकाश फातर्पेकर, प्रकाश सुर्वे, अजय चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
०००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/2Xr3inW
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment