मुरुडमध्ये २ हजार शेतकऱ्यांनी दिले मिस कॉल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोहिमेला प्रतिसाद - latur saptrang

Breaking

Sunday, September 26, 2021

मुरुडमध्ये २ हजार शेतकऱ्यांनी दिले मिस कॉल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोहिमेला प्रतिसाद



 मुरुड (श्रीकांत टिळक)- :स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी जिल्ह्यात  मिस-कॉल मोहीम राबवली जात आहे.या अंतर्गत मुरुड येथे २ हजार शेतकऱ्यांनी संबंधित क्रमांकावर मिस कॉल करून शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला.
   रविवारी (दि.२६ सप्टेंबर)मुरुड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मिस-कॉल मोहीम राबविण्यात आली. शहर व परिसरातील २ हजार शेतकऱ्यांनी ८४४८१८३७५१  या क्रमांकावर मिस कॉल करून उसाच्या एफआरपी संदर्भातील निर्णयावर आपला राग व्यक्त केला.
आमच्या उसाला एकरकमी भाव मिळावा अन्यथा पुढील काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठीशी उभे राहून शेतकरी आंदोलन करतील असा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला.
  या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष धर्मराज पाटील,विधी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार जाधव,लातूर तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, उस्मानाबादचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विष्णुदास काळे, उस्मानाबाद जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत समुद्रे, लातूर तालुका युवा अध्यक्ष सुदाम कदम,मधुकर महेंद्र, संतोष सोनपेठकर,रामा मायंदे,अध्यक्ष राजाराम शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे,प्रकाश सोनपेठकर,संदिपान वीर
यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



पश्‍चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Attachments area

No comments:

Post a Comment