परळीत एमआयएमची ताकदाद वाढ, वार्ड क्रमांक ७ मध्ये शहेबाज कुरेशी समेत अनेंक युवकांनी केले एमआयएम मध्ये प्रवेश - latur saptrang

Breaking

Friday, September 3, 2021

परळीत एमआयएमची ताकदाद वाढ, वार्ड क्रमांक ७ मध्ये शहेबाज कुरेशी समेत अनेंक युवकांनी केले एमआयएम मध्ये प्रवेश



 परळी (प्रतिनिधी) :- एमआयएम परळीत नगर परिषदवर उर्दू भाषेत नावाच्या मुद्दयांवरुन खुप चर्चेत आहे. परळीत एमआयएम  पक्षाचे तालुका अध्यक्ष पदाच्या धुरा जेव्हापासून शरीफ भाईंच्या खांद्यावर पक्षांनी सोपली तेव्हापासून शरीफ भाई रात्रदिवस एक करून पक्ष परळीत वाढविण्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करत असल्याने सळसळत्या रक्तांच्या तरुणांमध्ये एमआयएम पक्षात प्रवेशासाठी स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे.

 एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी , एमआयएम महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलील सहाब आणि एमआयएम बीड जिल्हा अध्यक्ष शफिक भाऊ व परळी तालुका अध्यक्ष शरीफ भाई यांच्यावर विश्वास ठेऊन काल परळीत कुरेशी मोहल्या च्या युवा समाजिक कार्यकर्ता शहेबाज कुरेशी समेत अनेक युवकांनी एमआयएम पक्षात जाहीर प्रवेश केला. पुढील आयुष्यात पक्षा साठी नेहमीच अग्रेसर असु असा विश्वास शहेबाज कुरेशी व मित्र परिवारने परळी तालुका अध्यक्ष शरीफ भाई यांना दिले.

No comments:

Post a Comment