लातूर,दि.२५ः (शेख जफर) लातूर येथील तेरा वर्षीय यश गजानन लासूरेच्या स्वरयंत्रात झालेला दुर्मिळ दोष गायत्री हॉस्टिपटलचे डॉ.रमेश भराटे यांनी दूर करुन त्याला जीवदान दिल्याने डॉ.भराटेंचे कौतुक होत आहे.यशला दहा दिवसानंतर डिसचार्ज मिळाला असून,त्याची प्रकृती उत्तम आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,दहा दिवसांपूर्वी सायंकाळी लातूर येथील यश गजानन लासूरे याला श्वास घ्यायला कमालीचा त्रास होत असल्याने त्याचे आजोबा ऍड.शंकर सूर्यवंशी व आई वैशाली लासूरे यांनी त्याला तातडीने छातीविकार तज्ञ डॉ.रमेश भराटे यंाच्या गायत्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ.भराटे यांनी त्याची बारकाईने तपासणी करुन यशच्या श्वास नलिकेत बाधा असल्याचे निदान झाले म्हणून व्हिडीओ असिस्टेड ब्रांकोस्कोपीकरुन निदान करण्याचे निश्चित केले.तथापि दुर्बिनद्वारे तपासणी करताना रुग्णाच्या स्वरयंत्रात दोष असल्याचे तसेच स्वरयंत्र जवळपास ९० टक्के बंद असल्याचेही लक्षात आले,मग डॉ.भराटे यांनी रुग्णाची लेझर थेरपी करुन,स्वरयंत्र व श्वसन नलिका या दोन्ही वाचविण्यात यश मिळवले.त्याबद्दल डॉ.भराटे व त्यांच्या चमूचे यशच्या पालकांसह सर्वत्र अभिनंदन होत आहे.अशा स्थितीला वैद्यकीय परिभाषेत बायलॅटरल ऍबडकटर पाल्सी असे संबोधले जाते.अशी घटना दुर्मिळ असते आणि रुग्णावर वेळीचे उपचार करणे गरजेचे असते,असे डॉ.भालचंद्र पैके व डॉ.सचिन गांधी (पुणे) यांनी सांगितले.यशला दहा दिवसानंतर पूर्णतः बसे वाटत असून,त्याला घरी सोडण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment