मुंबई, दि. 14 : कोरेगाव- खटाव (सातारा) येथील जलसंधारण अंतर्गत येणारे दुरुस्ती आणि नवीन कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर कराण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची दिले.
मंत्रालयात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव व खटाव तालुक्यांतील विकास कामे व नवीन कामे सामाविष्ट करण्याविषयी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी विभातील वरिष्ठ अधिका-यांना निर्देश दिले. यावेळी विधानसभा सदस्य श्री. महेश शिंदे, पुणे विभागाचे मृद व जलसंधारण प्रादेशिक अधिकारी दि.शा.प्रशाळे,सातारा सहजिल्हा जलसंधारण अधिकारी प्र.बा.सोनावले,विभागाचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री गडाख म्हणाले, राज्य शासन, मृद व जलसंधारण विभागाकडील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट असलेल्या कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यातील एकूण ११ दुरुस्तीच्या कामांना मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या कामाची प्रशासकीय मान्यता रक्कम रु. 138.91 लक्ष इतकी आहे. या मंजूर कामापैकी एक काम पूर्ण असून दोन कामे प्रगतीपथावर आहेत.
विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यातील एकूण 105 कामांची दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये पाझर तलाव दुरुस्ती करणे, सिमेंट काँक्रीट बंधारे दुरुस्त करणे, कोल्हापूर पधतीचे बंधारे दुरुस्ती करणे, साठवण बंधारे दुरुस्ती करणे व गाव तलाव. दुरुस्ती करणे या कामांचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच २५१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेचे जलसंपदा विभागाकडील प्रकल्प तातडीने हस्तांतरीत करुन घेऊन आवश्यकतेप्रमाणे दुरुस्तीची कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3nttlW0
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment