· अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा
· नदीकाठच्या नुकसानीबाबत १०० टक्के नुकसान भरपाई देणे बाबत
विमा कंपन्यांनी कार्यवाही करावी
·एकही शेतकरी मदती पासून वंचीत राहू नये याची दक्षता घ्यावी
· रस्ते आणि पुलांची तात्काळ दुरूस्ती करावी
अतिवृष्टी व पुरग्रस्थ भागाच्या भेटी दरम्यान
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून निर्देश
लातूर प्रतिनिधी (गुरूवार दि. ३० सप्टेंबर २१)
अतिवृष्टी आणि पुरामुळे लातूर जिल्हयात प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. एकंदरीत या आपत्तीचा विचार करता शेतकऱ्यांना सरसगट मदत करण्या बाबत शासन सकारात्मक आहे, त्या सोबतच नदीकाठी झालेल्या नुकसानीची शंभर टक्के भरपाई मिळणे बाबत विमा कंपन्यानी कारवाई सुरू करावी असे निर्देशही राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी आज लातूर जिल्हयातील निलंगा तालुक्यातील गौर, मसलगा, उजेड शिरूरअनंतपाळ तालुक्यातील साकोळ, देवणी तालुक्यातील तळेगाव, जवळगा तसेच इतर काही गावच्या शिवारात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधला. मागच्या पन्नास वर्षात हे सर्वांत मोठे आस्मानी संकट असल्याचे गावकऱ्यांनी त्यांना सांगितले. शेतीमध्ये सोयाबीन, तूर, भाजीपाला, ऊस यासह इतर सर्व पिकांची झालेली अवस्था त्यांच्या निर्दशनास आणून दिली. ग्रामस्थाचे म्हणणे ऐकून घेतल्या नंतर पालकमंत्री त्यांना धिर देत महाविकास आघाडीचे सरकार आपत्तीग्रस्थांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. एकुण संकटाची व्याप्ती लक्षात घेता सरसगट मदत करण्या बाबत मुख्यमंत्री आणि सरकार सकारात्मक असून येत्या आठ दिवसात निर्णय जाहिर होईल असे त्यांनी सांगितले.
या पाहणी दरम्यान सोबत असलेल्या जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी निलंगा शोभा जाधव, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, तहसीलदार देवणी सुरेश घोळवे यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्यात यावेत, शेतकऱ्यांचे जनावरे, औजारे वाहून गेले आहेत त्यांची नोंद घ्यावी, काही ठिकाणी पिका सोबत जमिनीही खरडून गेल्या आहेत त्यांची नोंद घ्यावी. नदीकाठी झालेल्या नुकसानीसाठी शंभर टक्के भरपाई मिळण्याच्यादृष्टीने विमा कंपन्यांना पंचनामे करण्यास सांगावे, नुकसानी संदर्भ्ज्ञात विमा कंपनीने ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्विकारावे, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरही हे अर्ज स्विकारण्याची व्यवस्था उभारावी एकदरीत या व्यवस्थेतून एकही शेतकरी मदती पासून वंचीत राहणार नाही असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
या अतिवृष्टी आणि पुरामुळे ठिकठिकाणी रस्ते आणि पुलाचे नुकसान झाले आहे. हे रस्ते आणि पूल तातडीने दुरूस्त करण्याची मोहिम राबवण्यात यावी असे निर्देशही त्यांनी या प्रसंगी दिले.
या पाहणी दौऱ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, सचिव अभय साळुंखे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, नूतन अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, देवणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजित बेळकोने, बाबासाहेब पाटील उजेडकर, जवळगा गावचे सरपंच हनमंत बिराजदार, तलाठी आतिष बनसोडे, अनिल पाटील, एकनाथ पाटील, विजय बिराजदार, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम.पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, सुधाकर पाटील, तालुका कृषी अधिकारी निलंगा राजेंद्र काळे, तहसीलदार शिरूर अनंतपाळ अतुल जटाळ, साकुळ चे सरपंच कमलाकर मादळे, उपसरपंच राजकुमार पाटील, कल्याण बरगे, सोनु डगवाले आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment