ई-श्रम कार्ड योजनेचा असंघठीत कामगारांनी लाभ घ्यावा - जाबेरखान पठाण - latur saptrang

Breaking

Wednesday, September 15, 2021

ई-श्रम कार्ड योजनेचा असंघठीत कामगारांनी लाभ घ्यावा - जाबेरखान पठाण




परळी (प्रतिनिधी)

केंद्रीय कामगार मंत्रालयाने ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टल च्या माध्यमातून देशातील जवळपास 38 कोटी असंघठीत कामगारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात सर्व प्रकारच्या असंघठीत कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरीत मजूर,फेरीवाले मजूर,घर कामगार, शेती कामगार व इतर सर्व प्रकारच्या असंघठीत कामगारांची नोंदणी सी.एस.सी. च्या माध्यमातून करता येणार आहे. या योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना केंद्र सरकारच्या वतीने  2 लक्ष रू.विमाकवच मिळणार आहे. अपघातात कायम स्वरूपी अपंगत्व आल्यास 1 लक्ष रू.ची भरपाई सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. पोर्टलवर नोंदणी झालेल्या कामगारास 12 अंकी  यूनिक नंबर असलेले श्रम कार्ड मिळणार आहे. 

या योजनेत नाव नोंदणीसाठीची वयोमर्यादा 16 ते 60 वर्ष असुन या वयोगटातील मजूरांनी सदरील योजनेचा लाभ घेण्याचे अवाहन परळीचे माजी नगर

अध्यक्ष जाबेर खान पठाण यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 15 मधिल असंघठीत कामगारांना केले आहे.  प्रभाग क्रमांक 15 मध्ये असलेले 'ताज खान हज हाउस' येथे दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ई-श्रम कार्ड योजनेच्या नाव नोंदनी शिबीराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याने या प्रभागातील असंघठीत कामगारांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून सदरील योजनेचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment