भूकंपाच्या धक्क्यानं कोल्हापूर हादरलं; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - latur saptrang

Breaking

Sunday, September 5, 2021

भूकंपाच्या धक्क्यानं कोल्हापूर हादरलं; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

latursaptrangnews


 कोल्हापूरः कोल्हापूरात शनिवारी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.

    कोल्हापूरपासून १९ किलोमीटर कळे गावाजवळ केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. सौम्य भूकंपाचे धक्के असले तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. काही भागांत भूकंपाचे धक्के सर्वसामान्यांना जाणवले नसल्याचीही माहिती समोर येत आहे.

    वारणा खोरे व कळे हे भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. भूकंपाची खोली जमिनीच्या आत ३८ किलो मीटर असल्याने भूकंपाचा धक्का जाणवला नाही. वारणा भुमापन केंद्रावरही या भूकंपाची नोंद झाली आहे. भूकंपाची नोंद झाल्यावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष दक्ष झाले होते पण कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. कोयना धरणावरील भूमापन केंद्रावरही उजनी खरात भूकंप झाल्याची नोंद आहे.

कोल्हापूरबरोबरच आजूबाजूच्या परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याचबरोबर, सोलापूर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याबाबतचे वृत्त एका संकेतस्थळानं दिलं आहे.


No comments:

Post a Comment