‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्यापासून उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची निर्यात क्षेत्रातील संधी या विषयावर मुलाखत - latur saptrang

Breaking

Wednesday, September 29, 2021

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्यापासून उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची निर्यात क्षेत्रातील संधी या विषयावर मुलाखत

मुंबई,दि.29 – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात उद्योग विकास व राज्य निर्यात आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची ‘निर्यात क्षेत्रातील संधी आणि वाणिज्य उत्सव ‘या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एअर या ॲपवर गुरुवार दि. 30 सप्टेंबर आणि शुक्रवार दि. 1, शनिवार दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका शिल्पा नातू  यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यस्तरीय वाणिज्य उत्सवाचे यशस्वी आयोजन, उत्सवाच्या आयोजनामागील उद्देश, प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणारा निर्यात जागरुकता कार्यक्रम, ग्रामीण स्तरावर उद्योगांना चालना देण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न, प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यात येणारी एक्स्पोर्ट प्रमोशन कमिटी, राज्यातील निर्यातवाढीसाठी करण्यात येणारे प्रयत्न, राज्यातील गुंतवणूक करार आदी विषयांची सविस्तर माहिती डॉ. कांबळे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3uv0eDi
https://ift.tt/39f9xgE

No comments:

Post a Comment