नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र दिले; २२ बेरोजगारांची १ कोटींची फसवणूक - latur saptrang

Breaking

Thursday, September 16, 2021

नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र दिले; २२ बेरोजगारांची १ कोटींची फसवणूक

 चंद्रपूरः जिल्हा परिषदेतील नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र देऊन २२ बेरोजगारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेत बेरोजगारांनी सुमारे एक कोटी रुपयांहून अधिकने फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेत निवड झाल्याचे सांगत दोन युवक पोहचले होते. त्यांच्या पत्रावर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संगणकीकृत स्वाक्षरी असल्याचे दिसून आले. पण, अशी कुणालाही नियुक्ती देण्यात आली नसल्याचे समजताच शोध घण्यात आला. बेरोजगारांना देण्यात आलेली नियुक्ती प्रत बनावट स्कॅनिंगची असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठ यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. याप्रकरणी जिल्हा परिषदेकडे आलेल्या तक्रारीवरून दलालाने प्रत्येक उमेदवारांकडून तब्बल सात लाख रुपये घेतल्याची माहिती आहे. एकूण बेरोजगारांची संख्या लक्षात घेता हा आकडा १ कोटी ५४ लाख रुपयांवर जात असल्याचेही सांगण्यात येत आहे.

crime

No comments:

Post a Comment