महेश बिरादार मित्रपरिवाराच्या वतीने उदगीर तालुक्यातील सर्व ग्रामस्थांसाठी ओम शांती क्लिनिक,उदगीर येथे महिनाभर मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात लाईफ केअर हॉस्पिटल,उदगीर येथील प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ श्याम हिबाने सर यांच्यामार्फत तपासणी करण्यात येणार आहे.
सध्या चालू असलेली चिकन गुनिया ची साथ असो किंवा डेंग्यू असो तसेच सर्दी,ताप,खोकला,अंगदुखी,डोकेदुखी,पित्ताचा त्रास, लघवीचा त्रास,चक्कर येणे,मळमळ करणे,टायफाईड,मलेरिया,लहान मुलांचे सर्व आजार,महिलांचे सर्व आजार तसेच कोरोना संबंधित लक्षणे इत्यादी सर्व रोगांची तपासणी अगदी मोफत करण्यात येणार आहे.
परिसरातील ग्रामस्थांची सेवा करणे हा समाजोपयोगी उपदेश समोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या गावातील सर्व नागरिकांना आवाहन आहे कुठल्याही प्रकारच्या स्वास्थ्य संबंधित बाबीवर शंका असल्यास त्वरित मोफत तपासणी करून घ्यावी.
तपासणीसाठी नोंदणी आवश्यक.
नोंदणीसाठी संपर्क:
जिजाई मेडिकल स्टोअर्स, उदगीर
9403954432
शिबिराचे स्थळ:- ओम शांती क्लिनिक,उषा टॉकिजच्या समोर, हूडे कॉम्प्लेक्स,उमा चौक,उदगीर
No comments:
Post a Comment