मुंबई, दि.17: वेतन संहिता, 2019 च्या कलम 67 च्या पोटकलम (1) आणि (2) तसेच सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम,1897 (1897 चा 10) याच्या कलम 24 याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ/ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन आणि महाराष्ट्र किमान वेतन नियम, 1963 आणि महाराष्ट्र वेतन प्रदान नियम, 1963 यांचे अधिक्रमण करुन महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले नियमांचे पुढील प्रारुप, त्याद्वारे बाधित होण्याचा संभव असणाऱ्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी उक्त कलम 67 च्या पोट कलम (1) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे प्रसिध्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये ही अधिसूचना प्रसिध्द केल्याच्या तारखेपासून 45 दिवस समाप्त झाल्यानंतर हा मसुदा महाराष्ट्र शासनाकडून विचारात घेण्यात येईल. वेतन संहिता, 2019 अधिसूचना 3.9.2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
45 दिवसांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी या प्रारुपाच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडून कामगार आयुक्त, कामगार भवन, ई ब्लॉक, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-400059 यांना किंवा mahalabourcommr@gmail.com या ईमेलवर प्राप्त होतील असे कोणतेही आक्षेप/सूचना शासकनाकडून विचारात घेण्यात येतील.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3CAVU8r
https://ift.tt/39f9xgE
No comments:
Post a Comment