लालबागमधील परिस्थीती नियंत्रणाबाहेर गेल्यास...; नांगरे पाटलांनी दिला इशारा - latur saptrang

Breaking

Friday, September 10, 2021

लालबागमधील परिस्थीती नियंत्रणाबाहेर गेल्यास...; नांगरे पाटलांनी दिला इशारा




 मुंबईः लालबागच्या राजाच्या प्राण प्रतिष्ठापनेला उशीर झाल्याची माहिती समोर येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लालबाग परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज लालबाग परिसरात जाऊन गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यानंतर त्यांनी १४४ कलमानुसार निर्बंध घालण्यात आल्याची माहिती दिली. तसंच, यामध्ये थोडी सूट देऊन लवकरच नवे आदेश जारी केले जातील, अशी माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. तसंच, लालबागमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास पुन्हा १४४ कलम लागू केला जाईल, असंही त्यांनी बजावलं आहे.


'लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर १४४ कलमाअंतर्गंत लालबागमधील दोन्ही बाजूची १०० दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय शासनानं घेतला होता. लालबाग मंडळासोबत चर्चा करुन हा प्रश्न सोडवला आहे. दुकान मालक आणि एक कामगार यांना पोलिसांकडून पास दिले जातील. व आरतीच्या वेळेस फक्त दहा लोक असतील. या नियमांचे उल्लंघन झाल्यास पुन्हा १४४ कलमांनुसार कारवाई होईल,' असा इशारा विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे. तसंच, भाविकांना कोणत्याही प्रकारे मुखदर्शन व प्रत्यक्ष घेता येणार नाही, मात्र, घरी बसून सोशल मीडिया व ऑनलाइन दर्शन भाविकांनी घ्यावं, असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे.
मागील वर्षी लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाने आरोग्याच्या दृष्टीने चांगला उपक्रम घेतला. यंदाही यंदा दहा दिवस दुकाने बंद ठेण्याचा निर्णय हा १४४ कलमानुसार घेतला होता. पण सध्याच्या परिस्थितीत तोडगा काढून याबाबतचे आदेश देण्यात येतील. कोणी दर्शनासाठी गर्दी करणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल. आरतीसाठी दहा लोक कोण असतील त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. मग ते व्हिआयपी असो किंवा सर्वसामान्य, असंही नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment