लातुरः- लातुर जिल्ह्यातील धर्मादाय नोंदणीकृत रुग्णालयानी रुग्णालयाचा नावामध्ये अथवा नावासमोर धर्मादाय शब्द नमुद करावे या मा.धर्मादाय आयुक्त मुंबई यांचा दि 18-07-2018 रोजीच्या परिपत्रक क्रमांक 545 च्या आदेशाची अमलबजावणी करावी या मागणीचे निवेदन रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या वतीने लातुर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले
धर्मादाय नोंदणीकृत रुग्णालयात गरीब,निर्धन व आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांना अत्यल्प दरात, मोफत आणि सवलतीचा दरात उपचार होतात व धर्मादाय नोंदणीकृत रुग्णालयात रुग्णालयातील एकुन खाटापैकी 10 % खाटा या निर्धन रुग्णाकरीता व 10% खाटा या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णाकरीता राखीव असणे बंधनकारक आहे पण हे सर्वसामान्य गरिब रुग्णाना माहिती नसते व ज्यांना माहिती आहे त्यांना हे रुग्णालय खाजगी आहे कि धर्मादाय आहे हे समजत नाहि म्हणून सामान्य रुग्ण अश्या रुग्णालयात आर्थिक योजनेचा लाभापासुन वंचीत राहतो याचे कारण म्हणजे रुग्णालयाचा नावात धर्मादाय किंवा चॕरीटी हा शब्दच नसतो यामुळे असे रुग्णालये हे धर्मादाय रुग्णालय असल्याची माहिती लपवून ठेवतात व शासकिय अनुदान तर घेतात अश्या प्रकारे रुग्णांची व शासनाची फसवणूक होत असल्याचा प्रकार होत आहे यासाठी मा.धर्मादाय आयुक्त यांनी रुग्णालयाचा नावात धर्मादाय हा शब्द नमुद करावा म्हणून परिपत्रक काढुन आदेश दिलेत परंतु याची अमलबजावणी होताना दिसत नाही म्हणून हे सर्वसामान्यानां असे रुग्णालये माहिती होणेसाठी मा. धर्मादाय आयुक्तांचा आदेशाची अमलबजावणी त्वरीत करण्याचे आदेश देऊन रुग्णांना न्याय द्यावे या मागणीचे निवेदन रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले अन्यथा समितीच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला समितीच्या शिष्टमंडळात रुग्ण हक्क संघर्ष समितीचे प्रमुख ॲड निलेश करमुडी, प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ, मराठवाडा अध्यक्षा पुजाताई निचळे, महिला अध्यक्षा मिनाक्षीताई शेटे, जिल्हा उपाध्यक्षा रेणुकाताई बोरा, युवती प्रमुख सुष्मिता बोरा आदि उपस्थित होते
No comments:
Post a Comment