सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ३ रिव्ह्यू: आधीपेक्षा मजबूत आणि फीचर लोडेड, या स्वस्त फोल्डेबल फोनमध्ये मिळेल बरचं काही - latur saptrang

Breaking

Sunday, September 12, 2021

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ३ रिव्ह्यू: आधीपेक्षा मजबूत आणि फीचर लोडेड, या स्वस्त फोल्डेबल फोनमध्ये मिळेल बरचं काही



 नवी दिल्ली : सॅमसंगने फोल्डेबल स्मार्टफोन्सला मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. आपल्या आधीच्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या तुलनेत कंपनीने यावेळी बरेच बदल केले आहे. आधीपेक्षा स्वस्त, शानदार परफॉर्मेंस, वॉटर रेसिस्टेंट आणि ड्यूरेबलसह अनेक वैशिष्ट्यांसह सॅमसंग झेड फ्लिप ३ फोन येतो. या फोनच्या किंमतीत इतर नियमित फोन खरेदी करावा का ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. आम्ही हा फोन काही दिवस वापरून पाहिला. हा फोन कसा आहे हे रिव्ह्यूमधून जाणून घेऊया.



फोल्डेबल स्मार्टफोन आधीपेक्षा उत्तम

ओरिजिनल फ्लिपशी तुलना केल्यास नवीन फोल्डिंग ६.७ इंच ओलेड स्क्रीन दुप्पट फास्ट आहे. यामध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. याचा अल्ट्रा-थिन ग्लास कव्हर आधीपेक्षा चांगला आहे. मात्र, स्टँडर्ड स्मार्टफोन ग्लासपेक्षा सॉफ्ट आहे. याचे टच स्मूथ आहे. यात नियमित फोनपेक्षा वेगळे काही जाणवणार नाही. स्क्रीन फोल्ड झाल्यावर मध्यभागी क्रीज तयार होते, जे व्हीडिओ, फोटो व व्हिज्यूल एक्सपिरियन्समध्ये स्पष्ट दिसते. याशिवाय टॉप आणि बॉटमध्ये स्टीरियो स्पीकर देण्यात आला आहे. यात साउंड डिसेंट आहे. फोनचे बॅक स्मूथ आहे व सहज स्लाइड होते. स्क्रीनवर फिंगरप्रिंट्सचे ठसे देखील सहज उमटतात. याची कॉल क्वालिटी आणि ५जी परफॉर्मेस उत्तम आहे.



याचे सर्वात मोठे फिजिकल अपग्रेड वॉटर रेसिस्टेंट आहे. हा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे, जो आयपीएक्स८ रेटिंगसह येतो. फोन १.५ मीटर खोल पाण्यात मिनिटं टिकू शकतो. डिव्हाइस डस्ट रेसिस्टेंट नाही. कंपनीचे म्हणणे आहे की, फोनला समुद्र किनारी अथवा मातीमध्ये व्यवस्थित वापरा अथवा स्क्रीनवर परिणाम होऊ शकतो. तसेच, खिशात अथवा बॅगमध्ये ठेवताना स्क्रीनमध्ये चावी अथवा इतर वस्तू येणार नाही याची काळजी घ्या. याबाबतीत फोनला व्यवस्थित हाताळणे गरजेचे आहे.



डिझाइन आणि डिस्प्ले

Galaxy Z Flip 3 व्हर्टिकली फोल्ड होऊन खिशात सहज बसेल. कंपनीने डिझाइन शानदार दिले आहे. सॅमसंगने यावेळी खास फ्रेम आणि हिंजवर काम केले आहे. ड्यूरेबिलिटीसाठी अ‍ॅल्यूमिनियम आणि गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन दिले आहे.



याचे डिझाइन तुम्हाला नक्कीच आवडेल. वारंवार फ्लिप करायला तुम्हाला आवडेल. लुकच्या बाबतीत हा फोन सुंदर आहे. याला थ्री-टोन डिझाइनचा फोन म्हटले जाऊ शकते. याचा कव्हर डिस्प्ले ब्लॅक ग्लासचा आहे. बॉडी आणि हिंजमध्ये दोन वेगवेगळे शेड दिले आहे. आमच्याकडे याचे ब्लॅक कलर यूनिट उपलब्ध आहे व हे खूपच आकर्षक दिसते.



याचा कव्हर आणि फोल्डेबल, दोन्हीही डिस्प्ले शानदार अपग्रेडसोबत सादर करण्यात आले आहे. याची कव्हर स्क्रीन आधीपेक्षा मोठी आहे व आधीपेक्षा अधिक कामाची आहे. यात सेल्फी काढण्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने फ्रेम पाहू शकता. याचा कव्हर डिस्प्ले फोनला एकदम क्लासी लूक देतो. याची मुख्य स्क्रीन एमोलेड पॅनेलची आहे. दिवसाच्या प्रकाशात काम करताना कोणतीही अडचण येणार नाही. यात अल्ट्रा-वाइड अँगल्स, कलर्स स्पष्टपणे दिसतात. याचे प्री-इंस्टॉल्ड प्लास्टिक फिल्म आधीपेक्षा ८० टक्के मजबूत आहे. मात्र, आताही असे वाटत नाही की तुम्ही ग्लास टच करत आहात, परंतु आधीपेक्षा चांगले आहे.




बॅटरी आणि परफॉर्मेंस

Z Flip 3 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर मिळतो. हाच प्रोसेसर कंपनीने गॅलेक्सी एस२१ सीरिजमध्ये दिला आहे. भारतात हा Exynos २१०० सोबत येतो. यामुळे परफॉर्मेंस चांगला होतो. अनेक अ‍ॅप्स एकाचवेळी वापरू शकता. गेमिंग परफॉर्मेंस देखील टॉप अँड्राइड फोन्सप्रमाणे आहे. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत अनलॉक स्पीड देखील फास्ट आहे. मात्र, अनेकदा फोन हँग झाला, जे अशाप्रकारच्या फोनमध्ये होणे माइनस प्वाइंट आहे.



बॅटरी लाइफच्याबाबतीत फोनला सरासरी म्हणता येईल. फोन फुल चार्जमध्ये दिवसभर चालतो. मात्र, असे २-३ तास स्क्रीन टाइम असल्यावर होते. यापेक्षा चांगली बॅटरी लाइफ एस२१+ ची आहे. कंपनीने झेड प्लिप ३ मध्ये अपेक्षेप्रमाणे बॅटरी बॅकअप दिलेला नाही.




सॉफ्टवेअर

फोन अँड्राइडचे कस्टमाइज्ड व्हर्जन वनयूआय ३.१ वर काम करते. हे व्हर्जन मॉडर्न आणि ऑर्गनाइज्ड आहे. हे स्मूथ एक्सपिरियन्स देते. फोल्डिंग स्क्रीन लक्षात घेऊन यात काही खास फीचर्स मिळतात. यात प्लेक्स मोडचा समावेश आहे. या फीचरमध्ये डिस्प्ले एल शेपमध्ये फोल्ड केल्यास स्क्रीन स्प्लिट होते. फोनला ४ वर्ष सॉफ्टवेअर अपडेट मिळेल. यात महिन्याला सिक्योरिटी पॅचेस देखील मिळेल.



Samsung Z Flip 3 मध्ये ड्यूल १२ मेगापिक्सल रियर कॅमेरा दिला आहे. यातील एक वाइड कॅमेरा आणि एक अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेऱ्याने चांगले फोटो येतात. गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगले म्हणायला हवे. प्रकाशात व्हीडिओ देखील चांगले येतात. यात टेलिफोटो कॅमेरा दिलेला नाही. फोन बंद करून मुख्य कॅमेऱ्याचा वापर सेल्फी काढण्यासाठी करू शकता.



याशिवाय यात आणखी एक खास फीचर मिळते. नॉर्मल फोटो काढताना कव्हर स्क्रीनला ऑन करू शकता. यामुळे फोटो काढताना सबजेक्ट स्वतःला पाहू शकेल. मुख्य स्क्रीनवरील सेल्फी कॅमेरा देखील चांगला आहे. फ्लिप ३ कॅमेऱ्याच्याबाबतीत चांगले डिव्हाइस असून, या रेंजमध्ये येणाऱ्या स्टँडर्ड डिव्हाइसप्रमाणेच आहे.


'तीन महिन्यात आरक्षण द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू'

No comments:

Post a Comment