युपीएससीचा निकाल आज जाहीर झाला. यात लातूर जिल्ह्यातील सात युवकांनी यश संपादन केले आहे. विनायक प्रकाशराव महामुनी याने देशात ९५वा रँक मिळवला आहे. तो येथील केशवराज विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. त्यापाठोपाठ कमलकिशोर कांदरकरने देशात १३७ वा रँक मिळवला. तर नितिशा संजय जगताप या अवघ्या २१ वर्षांच्या तरुणीने पहील्याच प्रयत्नात हे दैदिप्यमान यश संपादन करत १९९ वा रँक मिळवला. अभिजित वेकोसेने ५०१वा रँक मिळवला. शुभम स्वामीने ५२३वा तर ७५ टक्के दृष्टीदोष असताना औसा तालुक्यातील टाका या छोट्याशा गावातून आलेल्या पुजा अशोक कदम हीने ५७७ ही रँक मिळवत डोळे दिपवणारे यश संपादन केले आहे. तर निलेश श्रीकांत गायकवाड याने सलग दुसऱ्या वर्षी यश संपादन करताना देशात ६२९ वा रँक मिळवला आहे. निलेशला मागच्यावर्षी ७५२वा रँक मिळाला होता. त्याला संरक्षण सहाय्यक म्हणून नियुक्ती मिळाली होती आणि पुणे येथे त्याचे प्रशिक्षणही सुरु होते.
No comments:
Post a Comment