आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना - latur saptrang

Breaking

Wednesday, September 22, 2021

आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना

मुंबई, दि. २२ :- राज्यातील सर्व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षरता मंडळाची (Electoral Literacy Club) स्थापना करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने पुरस्कृत केलेल्या मतदारांचे पध्दतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP) कार्यक्रमाअंतर्गत साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात येणार असून वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

राज्यातील महाराष्ट्र आारोग्य विज्ञान विद्यापीठ, अभिमत विद्यापीठे, एम्स (AIMS) येथील सर्व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या महाविद्यालय परिसरामध्ये एक निवडणूक साक्षरता मंडळ (Electoral Literacy Club) स्थापन करण्यात येणार आहे. निवडणूक साक्षरता मंडळ (Electoral Literacy Club) स्थापन करताना कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.

प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थ्यांशी संपर्क साधून एक निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करावे, निवडणूक साक्षरता मंडळासाठी नोडल अधिकारी व मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील एका प्राध्यापकाची नेमणूक करावी. महाविद्यालयातील विद्यार्थी हे निवडणूक साक्षरता मंडळाचे सभासद असतील. प्रत्येक वर्गातील निवडलेले प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांकडून निवडलेली समिती ही या मंडळाचे कामकाज पाहतील. निवडलेले विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक साक्षरता मंडळाच्या कार्यकारी समितीची स्थापना करतील. निवडलेले विद्यार्थी प्रतिनिधी हे मंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करतील. विद्यार्थी प्रमुखामार्फत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा निवडणूक साक्षरता मंडळामध्ये समावेश करुन घेण्यात यावा. तसेच आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रमुख हा निवडणूक साक्षरता मंडळाचा संयोजक राहील आणि तो नोडल अधिकारी यांना त्यांच्या कार्यामध्ये सहाय्य करील.

कोविड-19 मुळे प्रत्येक आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे व्हॉटसॲपवर किंवा टेलिग्रामवर विषयनिहाय गट करण्यात आलेले आहेत. या ग्रुपवर निवडणूक साक्षरता मंडळाची माहिती देऊन तसेच आभासी माध्यमांवर व्याख्याने आयोजित करुन विद्यार्थ्यांना निवडणूक साक्षरता मंडळाचे महत्त्व पटवून देण्यात यावे. यासाठी गुगल मीट, झूम किंवा इतर आभासी व्यासपीठांवर विद्यार्थ्यांसह बैठक आयोजित करुन त्यांचे शंका निरसन करण्यात यावे. प्रत्येक आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाने 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत त्यांच्या महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करावी. तसेच 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत निवडणूक साक्षरता मंडळाचा नोडल अधिकारी असणाऱ्या शिक्षकांचे आणि विद्यार्थी प्रमुखांचे संपर्क क्रंमाक आणि मेल आयडी  मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाला आणि संबंधित जिल्हा कार्यालयाच्या मेल आयडीवर कळवावेत.

सन 2021-22 मध्ये निवडणूक साक्षरता मंडळांतर्गंत वेगवेगळया ऑनलाईन स्पर्धा, लोकशाही विषयावर विविध वेबसंवाद, चर्चासत्रे, व्याख्याने याबरोबरच विशेष दिनांचे आयोजन करण्यात यावे. राज्यस्तरावरील विविध उपक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात यावे.

नोडल अधिकारी यांनी निवडणूक साक्षरता मंडळामध्ये समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा निवडणूक साक्षरता मंडळासाठी व्हॉटसअपवर किंवा टेलिग्रामवर एक स्वतंत्र गट तयार करावा. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आयोजित करत असलेल्या विविध ऑनलाईन, ऑफलाईन स्पर्धां तसेच वेबसंवाद, परिसंवाद यांची माहिती नोडल अधिकाऱ्यांनी शेअर करावी. आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमधील 18 वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केली आहे किंवा नाही यांच्या नोंदी घेऊन त्या अद्ययावत कराव्यात. आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम महाविद्यालयाच्या निवडणूक साक्षरता मंडळांतर्गत आयोजित करण्यात आलेले उपक्रम, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या उपक्रमांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग, त्या महाविद्यालयातील एकूण विद्यार्थी, मतदार नोंदणी केलेले, नोंदणी न केलेले विद्यार्थी याविषयीचा सहामाही आणि वार्षिक अहवाल मुख्य निवडणूक अधिकारी यांना ceo_maharashtra@eci.gov.in या मेल आयडीवर तसेच संबंधित उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांना कळवावा.

 



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3o4Ib5o
https://ift.tt/3AsAgCq

No comments:

Post a Comment