अहमदपूर आणि जळकोट तालुक्यातील गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कराव्यात – पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे - latur saptrang

Breaking

Tuesday, September 21, 2021

अहमदपूर आणि जळकोट तालुक्यातील गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कराव्यात – पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे

मुंबई, दि. 21 : जलजीवन मिशनमध्ये तयार करावयाच्या प्रादेशिक योजनेमध्ये अहमदपूर तालुक्यात येणारी 10 गावे आणि जळकोट तालुक्यात येणारी 8 गावे यासाठी दोन वेगळ्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना करण्यात याव्यात, अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केल्या.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम कृती आराखडाअंतर्गत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अस्तित्वातील जुन्या योजनांपैकी  18 गावांसाठी नव्याने प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजुरीबाबतची आढावा बैठक मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला आमदार बाबासाहेब पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, जलजीवन अभियनाचे संचालक, ऋषिकेश यशोद लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिनव गोयल, औरंगाबादच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री.बनसोडे म्हणाले की, ग्रामीण भागात दरडोई 55 लिटर प्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वतता टिकून राहण्यासाठी राज्यात जल जीवन अभियान  राबविण्यात येत आहे. 18 गावांना एकत्र पाणीपुरवठा करताना काही अडचणी समोर येत असल्याने अहमदपूर आणि जळकोट तालुक्यांसाठी वेगळ्या पद्धतीचे नियोजन करण्यात यावे. पाणी पुरवठा जरी एकाच जॅकवेल मधून करण्यात येणार असला तरी दोन तालुक्यातील गावांसाठी वेगळी पाईपलाईन यंत्रणा कार्यान्वित करावी. तसेच लातूर जिल्ह्यासाठी नेमण्यात आलेल्या वॅप्कॉस या सल्लागार कंपनीद्वारे सर्व योजनांचे आराखडे ऑक्टोबर 2021 अखेर पूर्ण करण्यात यावेत, असे निर्देश श्री.बनसोडे यांनी दिले.

 

००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/39pbW8F
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment