शारदा ज्युनिअरमध्ये ५२९ विद्यार्थ्यांनी दिली ‘नीट’ परीक्षा - latur saptrang

Breaking

Sunday, September 12, 2021

शारदा ज्युनिअरमध्ये ५२९ विद्यार्थ्यांनी दिली ‘नीट’ परीक्षा



 लातूर, दि.१२- वैद्यकीय प्रवेशासाठी आयोजित करण्यात आलेली एनईईटी (नीट) ची परीक्षा येथील शारदा ज्युनिअर महाविद्यालयात शांततापूर्ण वातावरणात सुरळीत पार पडली. महाविद्यालयात ही परीक्षा एकूण ५४० पैकी ५२९ विद्यार्थ्यांनी दिली. ११ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले.

   वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्र सरकारच्यावतीने बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एनईईटी (नीट) परीक्षा घेण्यात येते. दरवर्षी ही परीक्षा मे महिन्यात होते. परंतु, यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ही परीक्षा रविवार, १२ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत घेण्यात आली. येथील शारदा ज्युनिअर कॉलेजमध्ये ५४० विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परवानगी देण्यात आली होती. यामध्ये एका वर्गात १२ विद्यार्थ्यांनाच बसवण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांना केवळ ओळखपत्र देवून परीक्षेसाठी सोडण्यात आले. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क व मोफत पिण्याचे पाणी पुरविले. रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा केंद्र प्रमुख म्हणून प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे यांनी काम पाहिले. ७५ कर्मचार्‍यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment