कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीराचे आयोजन - latur saptrang

Breaking

Tuesday, October 5, 2021

कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीराचे आयोजन

(मुरूड) संभाजी महाविद्यालय मुरूड राष्ट्रीय सेवा योजना व प्राथमिक आरोग्य केंद्र निवळी अंतर्गत मुरूड उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.07 ऑक्टोबर 2021 रोजी संभाजी महाविद्यालय मुरूड येथे सकाळी 10.30 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करून कोविड मुक्त महाविद्यालय यासाठी प्रयत्न केला जात आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या लसीकरणास उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन 

आरोग्याधिकारी डॉ. श्री. पलंगे सर, डॉ. श्री. बिरादार सर, समाज जागृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. बी.एस.(दादा) पटाडे, सचिव मा.अॅड.विजय पाटील, संस्थेचे इतर सदस्य व प्राचार्य डॉ. नरेंद्रजी माळी, कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.चावरे एम.व्ही.यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment