लातूर,दि.13 : जिल्ह्यातील भटके - विमुक्त समाजासाठी करीत असलेले निस्वार्थ कार्य, उल्लेखनीय सामाजिक व वंचित उपेक्षित समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी हक्क परिषदेने उभारलेल्या लढ्यात सक्रिय सहभाग घेऊन महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत अव्वल कारकून दत्तात्रय रतनराव सुर्यवंशी यांची भटके- विमुक्त हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश भांडे यांनी नुकतीच लातूर जिल्हा सहसचिव पदी निवड झाल्याबद्दल लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात नियुक्तीपत्र दिले. श्री.सूर्यवंशी यांची नियुक्ती पुढील तीन वर्षा साठी असून या काळात ते भटके - विमुक्त हक्क परिषदेच्या ध्येय व धोरणानुसार संघटनेच्या विस्तारासाठी व बांधणीसाठी धडाडीने समाजकार्य करतील.,अशी अपेक्षा व्यक्त करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश भांडे, जिल्हा संघटक दिपक वाडेकर, दत्तात्रय सूर्यवंशी, श्रीनिवास काळे, विलास बडगे, बबनराव काळे आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment