मुंबई, दि. 09 : पानिपत, महानायक, झाडाझडती यांसह अनेक साहित्यकृतींचे लेखक विश्वास पाटील यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावर्षीचा ‘राजीव सारस्वत सन्मान’ प्रदान करण्यात आला.
श्रुती संवाद साहित्य कला अकादमीतर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार विश्वास पाटील यांना आज (दि. 9) राजभवन येथे प्रदान करण्यात आला. जेष्ठ साहित्यिक हस्तिमल हस्ती यांना 2020 या वर्षासाठीचा राजीव सारस्वत सन्मान प्रदान करण्यात आला.
सुप्रसिध्द साहित्यिक, कवी व हिंदुस्थान पेट्रोलियम येथे महाव्यवस्थापक (राजभाषा) पदावर कार्यरत असलेल्या राजीव सारस्वत यांचे मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबर 2008 च्या अतिरेकी हल्ल्यात निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रुती संवाद साहित्य कला अकादमीतर्फे साहित्यिकांना ‘राजीव सारस्वत सन्मान’ देण्यात येतो.
कार्यक्रमाला श्रुती संवाद अकादमीचे अध्यक्ष अरविंद राही, हिंदुस्थान पेट्रोलियमचे व्यवस्थापक पुष्प जोशी, महासचिव डॉ. अनंत श्रीमाली आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. वागीश सारस्वत, संजीव निगम तसेच इतर निवडक साहित्यिकांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
000
Governor presents Rajeev Saraswat Sanman to Vishwas Patil
Mumbai, 9th October : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari today presented the ‘Rajeev Saraswat Samman’ to well known writer and retired civil servant Vishwas Patil at Raj Bhavan, Mumbai on Saturday (9th Oct).
The award presented to renowned literary personalities for their outstanding contribution to literature has been instituted by the Shruti Samvad Sahitya Kala Academy in memory of well-known writer, poet and General Manager of Hindustan Petroleum Rajiv Saraswat who lost his life in the 26 /11 terrorist attack on Mumbai.
Writer and Poet Hastimal Hasti, Dr Vageesh Sarswat and Sanjeev Nigam were also honoured at the hands of the Governor.
President of the Shruti Samvad Sahitya Kala Academy Arvind Rahi, Honorary Secretary Dr. Anant Shrimali and General Manager of Hindustan Petroleum Pushp Joshi were present on this occasion.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3FqfVRf
https://ift.tt/3mCBBkp
No comments:
Post a Comment