बुलडाणा जिल्ह्यातील जिजामाता देऊळगाव राजा तालुका दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थेच्या मागण्यांबाबत सकारात्मक – दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार - latur saptrang

Breaking

Wednesday, October 13, 2021

बुलडाणा जिल्ह्यातील जिजामाता देऊळगाव राजा तालुका दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थेच्या मागण्यांबाबत सकारात्मक – दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार

मुंबई, दि. 13 : सहकारी दूध उत्पादक संघांबाबत शासन नेहमीच सकारात्मक असून बुलडाणा जिल्ह्यातील जिजामाता देऊळगाव राजा तालुका दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्थेच्या विविध मागण्यांसंदर्भातही सकारात्मक विचार करणार असल्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकाराने जिजामाता देऊळगाव राजा तालुका दुध उत्पादक व पुरवठा सहकारी संघाच्या  विविध मागण्यासंदर्भात पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या दालनात बैठक झाली.

दुधाळ जनावरांसाठी अनुदान मिळवणे, पशु खाद्य अनुदान मिळवणे, दूध दरात वाढ, दूध उत्पादक सहकारी संस्थांना दुध तपासणी किट मिळणे, दूध संघास दूध पॅकिंग, दुग्धजन्य पदार्थ बनवणे व दूध भुकटी बनवण्यासाठी प्रोजेक्ट मिळविणे आदी विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. दूध संघास येणाऱ्या समस्यांबाबतही यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली.

 



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3aBpn5U
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment