जवळपास दीड वर्षानंतर आजपासून शाळा सुरू होणार - latur saptrang

Breaking

Sunday, October 3, 2021

जवळपास दीड वर्षानंतर आजपासून शाळा सुरू होणार

 


शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांनी कोविड१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे 

 विद्यार्थी आणि पालक यानेही आवश्यक ती दक्षता घ्यावी

 पालकमंत्री नाअमित विलासराव देशमुख यांचे आवाहन

 

लातूर (प्रतिनिधी)

कोविड -१९ प्रादुर्भावाच्या  पार्श्वभूमीवर  बंद झालेल्या शाळा जवळपास दीड वर्षानंतर उद्यापासून सुरू होत आहेत,त्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांनी या संदर्भाने असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावीपालक आणि विद्यार्थ्यांनीही आवश्यक ती दक्षता घ्यावी असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण   सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

 

पालकमंत्री ना अमित देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कीकोविड -१९ चा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मार्च 2020 मध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

कोरोना  प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जवळपास दीड वर्षानंतर  शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ग्रामीण भागात यापूर्वी काही गावात वर्ग सुरू झाले होतेमात्र आता  सर्वच गावात  वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे त्याचबरोबर शहरातही उद्यापासून  वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार आहेत . शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी जवळपास सर्व शिक्षकांचे लसीकरण करण्यात आलेले आहेकाही कारणास्तव एखाद्या शिक्षकाचे  लसीकरण राहिले असल्यास त्या शिक्षकांनी तातडीने लस घेणे अनिवार्य आहे.

शाळा भरण्यापूर्वी सर्व वर्ग-खोल्याकार्यालय आणि शाळांचा परिसर स्वच्छ  निर्जंतूकीकरण करून घ्यावाशाळेत सॅनिटायझरची  व्यवस्था असावीमास्कचा वापर अनिवार्य करावाआवश्यकतेनुसार शाळेत विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांची व्यवस्था ठेवावीगरज पडल्यास तातडीने प्राथमिक किंवा ग्रामीण आरोग्य केंद्रात मदत मागावीशहरातही जवळपासच्या खाजगी किंवा शासकीय हॉस्पिटलची  मदत घेण्यात यावीसर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षकपालकविद्यार्थी यांच्यामध्ये कोरोनाच्या संदर्भाने काळजी घेण्याबाबत जागृती करावीपालकांनीही आपल्या पाल्याची काळजी घ्यावी .

कोविड प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही त्यामुळे सर्व प्रकारच्या दक्षता घेणे गरजेचे असल्याचे नमूद करून पालकांनी आपल्या पाल्यांना सर्दीखोकलाताप आल्यास  शाळेत पाठवू नये असे आवाहनही पालकमंत्री देशमुख यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment