मुरुड येथील दिव्यांग बांधवाचा "चार लाख ४६ हजार २७५ रुपयाचा निधी गेला कुठे ? प्रहार ग्रामविकास अधिकारी हजर नसल्यामुळे खुर्चीला निवेदन.... - latur saptrang

Breaking

Sunday, October 17, 2021

मुरुड येथील दिव्यांग बांधवाचा "चार लाख ४६ हजार २७५ रुपयाचा निधी गेला कुठे ? प्रहार ग्रामविकास अधिकारी हजर नसल्यामुळे खुर्चीला निवेदन....





मुरुड (श्रीकांत टिळक)  : - मुरुड येथील दिव्यांगांच्या पाच टक्के निधी संदर्भात दिव्यांग बांधवांनी प्रहारच्यावतीने मुरुड ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी याच्या खुर्चीला निधी वाटप करण्यासंबंधी निवेदन दिले आहे.


दिलेल्या निवेदनात विस्तृत असे म्हटले आहे की, मागील वर्षाचा २०१९ ते २०२० मधील मुरुड ग्रामपंचायतीच्या स्वनीधी उत्पन्नातील पाच टक्के निधी एकूण ४४६२७२ वाटप केलेला नाही तसेच २०२० ते २०२१ मधील एकूण निधी ३४८३२७ रू. १८९ दिव्यांग पैकी १३० दिव्यांगांना २३९५९० रू वाटप केला होता, पण ५९  दिव्यांगांच्या बँक खात्यावर हा निधी जमा झालेला नाही. एकूण रक्कम १०८७३७ रू हा निधी त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करावा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


निधी बँकेत जमा न झाल्यास प्रहारच्यावतीने दिनांक २०/१०/२०२१ ग्रामपंचायतीस घेराव घालण्यात येईल व पुढील परिणामास ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील असे म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती राज्यमंत्री बच्चु कडू, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर, गट विकास अधिकारी पंचायत समिती लातूर, मुरुड पोलीस स्टेशन आदिना देण्यात आल्या आहेत.


या निवेदनावर मेघराज अंधारे तालुका उपाध्यक्ष प्रहार, दत्ता खडके मुरुड शहराध्यक्ष, शैलेंद्र कोंडेकर मुरुड शहर उपाध्यक्ष, अमर नाडे (ग्रामपंचायत सदस्य मुरुड), संतोष काळे (ग्रामपंचायत सदस्य मुरुड), देशमुख उत्तरेश्वर, कोचेवाड अजय, भीमाशंकर स्वामी, विषाल कणसे (विद्यार्थी आघाडी प्रमुख भाजप), श्रीहरी चाळके, आदीच्या स्वाक्षऱ्या आहे.

No comments:

Post a Comment