कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एनसीबी) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली. या कारवाईवर राष्ट्रवादीने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत. ज्यावेळी आर्यन खान याला ज्या व्यक्तीने ताब्यात घेतले, त्या व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण एनसीबीने हा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याच जाहीर केलं होतं. पण राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्या व्यक्तीसंबंधी मोठा गौप्यस्पोट केला आहे. आर्यन खान याला ज्या व्यक्तीने ताब्यात घेतले. तो व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नव्हता. त्या व्यक्तीचे फोटो भाजपच्या नेत्यांसाबत आहेत, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे.
ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने ज्या आठजणांना अटक केली त्यात आर्यन खानसह मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट, नुपूर सारिका, इस्मीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोपित चोपडा यांचा समावेश आहे. एनसीबीच्या कारवाईवेळी तेथे दोन व्यक्ती होत्या. त्यांची नावे के. पी. गोसावी, भानुशाली अशी आहेत. त्यांना संशयित आरोपींना हाताळलं. गंभीर बाब म्हणजे भानुशालीचा भाजप नेत्यांसोबत फोटो आहेत. या दोन व्यक्ती नेमक्या कोण आहेत याचा खुलासा करावा आणि त्यांनी संशयित आरोपींना का हाताळलं, असे सवाल मलिक यांनी केले आहेत.
शाहरुखचा मुलगा आर्यन सोबत सेल्फी घेणारा व्यक्ती कोण? असा सवाल त्यांनी केला आहे. ड्रग्ज पार्टी म्हणजे रचलेली गोष्ट आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment