मुंबई, दि. 4 : अर्जेंटिना भारताशी अणुऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात सहकार्य करीत असून व्यापार, संस्कृती आणि पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत ह्यूगो जेवियर गोबी यांनी सांगितले.
राजदूत ह्यूगो जेवियर गोबी यांनी सोमवारी (दि. ४ ऑक्टो) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
भारताप्रमाणेच अर्जेंटिना देखील विलक्षण सुंदर देश आहे. 2019 मध्ये अर्जेंटिनाच्या २ दशलक्ष पर्यटकांपैकी केवळ १४००० पर्यटक भारतात आले तर भारताच्या १३ दशलक्ष पर्यटकांपैकी अवघे ८००० पर्यटक अर्जेंटिना पाहण्यास आले. हे चित्र बदलून उभय देशातील परस्परांच्या पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
मेसीचे चाहते भारतात अधिक : राज्यपाल
भारतात पर्यटनाच्या अनेक संधी असून अर्जेंटिनाने पर्यटन वाढविण्यासाठी सहकार्य करावे असे राज्यपाल कोश्यारी यांनी राजदूतांना सांगितले. फ़ुटबॉल भारतात लोकप्रिय खेळ असून अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटू मेसीचे चाहते अर्जेंटिनापेक्षा भारतात अधिक असल्याचे तसेच दंतकथा झालेले दिएगो मॅराडोना सर्वपरिचित असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
बैठकीला अर्जेंटिनाचे मुंबईतील वाणिज्यदूत गिलर्मो एड्युआर्दो डेव्होतो, उपवाणिज्य दूत सिसिलिया मोनिका रिसोलो, अर्जेंटिना दूतावासातील राजकीय विभाग प्रमुख रेनाटो मोरालेस हे उपस्थित होते.
*****
Argentinian Ambassador meets Governor Koshyari
Calls for enhancing relations in Trade, Tourism and Culture
Stating that Argentina has lots of ongoing cooperation with India in the field of nuclear research, the Ambassador of Argentina to India Hugo Javier Gobbi called for strengthening the cooperation with India in the areas of trade, tourism and culture.
The Ambassador was speaking to Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Monday (4th Oct) during a courtesy call.
Calling for a major fillip to tourism between India and Argentina, the Ambassador said Argentina, like India, is an incredibly beautiful country. He however lamented that only 8000 tourists from out of 13 million Indian tourists visited Argentina in the year 2019 while only 14000 tourists from Argentina’s 2 million tourists visited India.
More Messi fans in India : Governor
Stating that India offers tremendous opportunities for tourism, the Governor sought cooperation from Argentina in increasing tourism. The Governor said football is a popular sport in India and added that there are more fans of Messi in India than perhaps in Argentina. He said Argentinian football legend Diego Maradona is a household name in the country.
The Consul General of Argentina in Mumbai Guillermo Devoto, Deputy Consul General Cecilia Risolo and Head of Political Section in the Embassy of Argentina Renato Morales were present.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3D7JpkQ
https://ift.tt/39f9xgE
No comments:
Post a Comment