गुरुवारपासून लातुर शहरास आठवड्यातून दोन वेळा पाणी पहिले दोन आठवडे प्रायोगिक तत्त्वावर होणार अमंलबजावणी - latur saptrang

Breaking

Tuesday, October 5, 2021

गुरुवारपासून लातुर शहरास आठवड्यातून दोन वेळा पाणी पहिले दोन आठवडे प्रायोगिक तत्त्वावर होणार अमंलबजावणी

लातूर/प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने गुरुवार दि.७ ऑक्टोबर पासून लातूर शहरात आठवड्यातून दोनवेळा पाणी पुरवठा केला जाणार आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे.

   शहरातील नागरिकांना वेळेवर व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे याची मनपाकडून काळजी घेतली जाते. यावर्षी पाण्याची उपलब्धता लक्षात घेता आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा केला जाईलअसे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच घोषित केले होते. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने त्याची तयारी केली आहे. गुरुवारी घटस्थापने पासून शहरात दोनवेळा पाणीपुरवठा केला जाईल. दोनवेळा केला जाणारा पाणीपुरवठा प्रायोगिक तत्वावर असणार आहे. आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा करताना पाणी वितरणात येणाऱ्या अडचणी तसेच तक्रारींची दखल घेऊन पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे. शहरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मनपाच्या पाणी पुरवठा अभियंता नागनाथ कलवले यांच्या वतीने करण्यात आले आहे.



No comments:

Post a Comment