नांदगावात सरपंचानेच उखडून टाकला चार महिन्यापुर्वी झालेला रस्ता ग्रामसेवकाची पोलीसात धाव, सरपंचा विरोधात गुन्हा दाखल - latur saptrang

Breaking

Thursday, October 14, 2021

नांदगावात सरपंचानेच उखडून टाकला चार महिन्यापुर्वी झालेला रस्ता ग्रामसेवकाची पोलीसात धाव, सरपंचा विरोधात गुन्हा दाखल

 लातूर ,


            गावातील भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची ज्यांच्यावर जिम्मेदारी असते त्यात सरपंचाने चार महिन्यापुर्वी झालेला सिमेंट रस्ता चक्क जेसीबीच्या साह्याने उकडून टाकल्याचा प्रताप लातूर तालुक्यातील नांदगाव येथे समोर आला असुन या प्रकरणाच्या विरोधात ग्रामसेवकाने पोलीसात धाव घेतल्याने सरपंचांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           याबाबत थोडक्यात माहिती अशी की लातूर येथून जवळच असलेल्या नांदगाव येथे चार महिन्यांपूर्वी जन सुविधा योजने अंतर्गत शिवाजी साळुंके यांच्या घरापासून  भागवत ढमाले यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता मंजूर झाला होता. व शासनाच्या अंदाज पत्रकाप्रमाणे तो तयार ही करण्यात आला होता. मात्र २४ सप्टेंबर रोजी येथील सरपंच महादेव रामकिशन ढमाले यांनी सुधाकर पाटील यांच्या घरासमोरील रस्ता जेसीबीच्या साह्याने उखडून टाकल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामसेवक प्रसाद देशपांडे यांच्या तक्रारीवरून लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात सार्वजनिक रस्ता संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी सरपंच महादेव रामकिशन ढमाले यांच्याविरूद्ध कलम ४२७,४३१,३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment