राज्यावर लोडशेडिंगची टांगती तलवार?; दीड दिवसांचा कोळसा साठा उपलब्ध - latur saptrang

Breaking

Tuesday, October 12, 2021

राज्यावर लोडशेडिंगची टांगती तलवार?; दीड दिवसांचा कोळसा साठा उपलब्ध



 मुंबईः देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळं ऐन दसरा- दिवाळीच्या तोंडावर लोडशेडिंगची टांगती तलवार आहे. राज्यातील महाजनकोकडे फक्त दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळं राज्यात भारनियमनचं संकट गडद होत आहे.


महजनकोकडे केवळ दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध आहे. सध्या १, ९१, ४७५ मेट्रिक टन साठा महाजनकोकडे उपलब्ध आहे. मात्र, वीज निर्मितीसाठी रोज १, ४९, ००० मेट्रिक टन कोळशांचा वापर होतो. यावरुनच सरकारी ७ वीज केंद्रात अर्धा ते दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. मात्र, महाराष्ट्रासाठी कोळसा उपलब्ध होणार आहे. मात्र, तो कोळसा किती दिवस पुरेल याबाबत शंका आहे.
    
    महाजनकोचे राज्यात सात वीज केंद्र आहेत. त्यात कोराडीतील वीज केंद्रात सगळ्यात कमी फक्त २०, ३६४ मेट्रिक टन म्हणजेच ०. ६७ दिवसांचा कोळसा उपलब्ध आहे. तर, चंद्रपूरात २, ९२० मेगावॅटच्या वीज केंद्रात सगळ्यात जास्त म्हणजेच ८२, २६४ मेट्रिक टन म्हणजेच १. ६४ दिवसांचा साठा उपलब्ध आहे. दरम्यान, मुसळधार पावसाने कोळसानिर्मितीवर परिणाम झाला आहे.
मागणी कमी, तरी समस्येत वाढ

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वीजेचा वापर कमी झाला आहे. कोळशाचा पुरवठा कमी होत असल्याने मागणी कमी असल्यानंही राज्यावर वीज संकट कोसळलं आहे.१० ऑक्टोबर २०२०मध्ये २०, ५०५ मेगावॅट वीजेचा वापर झाला होता. तर, यंदा १० ऑक्टोबरला फक्त १९,००० मेगावॅट वीजेचा वापर झाला आहे.
केंद्र- उपलब्ध कोळसा

कोराडी- २, ४०० २०, ३६४ 
परळी- ७५०९,६७५
पारस - ५००६,९४८
नाशिक - ६३०८, २३६
खापरखेडा- १,३४० ३१, २५८
भुसावळ- १, २१० २८, ७३०
चंद्रपुर- २,९२० ८६, २६४

‘सर्च’च्या शोधग्राम प्रकल्पातील कामे प्रशासकीय यंत्रणेसाठीही पथदर्शी; राज्यपालांकडून प्रशंसा
महाराष्ट्र आणि मँचेस्टरमधील आर्थिक आणि राजनैतिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य करार

No comments:

Post a Comment