सर्वाधिक साठवण क्षमता असणाऱ्या उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल - latur saptrang

Breaking

Sunday, October 3, 2021

सर्वाधिक साठवण क्षमता असणाऱ्या उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल



 सोलापूर : पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण शंभरीकडे वाटचाल करत आहे,धरणात केवळ चार टक्के पाणीसाठा वाढल्यास हे धरण १०० टक्के भरणार आहे, सध्या ९६ टक्के भरले असून गेल्या दोन दिवसांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ३ दिवसांत ६ टक्के पाणी साठा वाढला आहे. (good news for the state ujani dam which has the highest storage capacity is 100 full)


सध्या पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असल्याने धरणात येणारा विसर्ग खूपच मंदावला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्याची वाढ ही धिम्या गतीने सुरू आहे.उजनी धरणातील पाणी साठ्याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ऊस, तरकारी आणि फळ उत्पादक, शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
रविवारी सकाळी उजनीतील पाणी साठा ९६.०४ टक्के आहे, तर आवक दौंड येथे ४ हजार ६२३ क्यूसेक्स आहे. बंडगार्डन (पुणे) येथे केवळ २ हजार ९१६ क्यूसेक्स आवक असून उपयुक्त पाणी साठा ५१.४५ टीएमसी इतका झाला आहे.
पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत धरणावर मुसळधार पाऊस झाल्यान धरणात ६ टक्केची भर पडली आहे. तर गेल्या १५ दिवसात जेमतेम १३ टक्के पाणी साठा वाढला आहे. पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग अगदीच कमी आहे.मात्र सोलापूर जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू झाला असून धरणात पाणी साठा वाढण्याची शक्यता आहे.

रविवारी सकाळी धरणाने ९६ टक्के ची पातळी ओलांडून ९६.०४ टक्के ची मजल मारली आहे. हा महत्वाचा टप्पा गाठला असून तीन दिवसांत १०० टक्के कधी होण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाचा जोर प. महाराष्ट्रात कमी आहे.त्यामुळे उजनीकडे लागलेले शेतकऱ्यांचे डोळे अजूनही धरण पूर्ण क्षमतेने कधी भरणार याकडे लक्ष लागले आहे. (good news for the state ujani dam which has the highest storage capacity is 100 full)

यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही
राष्ट्राचा पाया हा विचारांवर अवलंबून असतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  संदीप काळे यांचे ‘ऑल इज वेल’ या तीन भाषिक पुस्तकाचे प्रकाशन.


No comments:

Post a Comment