राज्य सरकारने ७२ तासांमध्ये नुकसान भरपाई न दिल्यास आम्ही शेतकरी "७२ तासांचे अन्नत्याग आंदोलन" करू : राज्य सरकारला अल्टिमेटम ! - latur saptrang

Breaking

Thursday, October 7, 2021

राज्य सरकारने ७२ तासांमध्ये नुकसान भरपाई न दिल्यास आम्ही शेतकरी "७२ तासांचे अन्नत्याग आंदोलन" करू : राज्य सरकारला अल्टिमेटम !


मराठवाड्याला अतिवृष्टीने झोडपून काढले. हाता-तोंडाशी आलेले पीक नेस्तनाबूत झाले. पिकांचे झालेले नुकसान ७२ तासांच्या आत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने पीक विमा कंपन्यांना पाठवावे, असे तुघलकी फर्मान ठाकरे सरकारने काढले. अतिवृष्टी झाल्यावर शेताकडे, आमच्या पशुधनाकडे बघावे की कागदी घोडे नाचवावे ?

तसेच सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जलप्रकल्प वेगाने भरत असताना कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे, जेणेकरून शेतीचे नुकसान होणार नाही, याबाबत देखील पत्रव्यवहार केला होता. मात्र निर्ढावलेल्या प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे अधिकचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पिकविम्याचे पैसे मिळाले नाही. ज्या बांधवांना मिळाले त्यांना कमी प्रमाणात मिळाले. यंदाचा विमा तसेच फरकाची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी.

बांद्रा व बारामतीच्या सरकारला या ग्रामीण प्रश्नांची जाण असणार नाही, याची कल्पना आम्हाला आहे. मात्र आम्ही आपल्याला ताळ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच जसा तुम्ही ७२ तासांचा फतवा जारी केला. आता आम्ही सर्व शेतकरी बंधूंच्या वतीने आपणास देखील ७२ तासांचा अल्टीमेटम देत आहोत. येत्या ७२ तासांत नुकसान भरपाई जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याबाबत कार्यवाही करावी.

येत्या ७२ तासांत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर "आम्ही ७२ शेतकरी ७२ तास" शिवाजी चौक येथे 'अन्नत्याग आंदोलन' करू. यात कोणाचेही बरे वाईट झाले अथवा संघर्ष निर्माण झाला तर त्यास सर्वस्वी 'एसी' मधील सरकार जबाबदार असेल. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी श्री.पृथ्वीराज बी.पी. जी यांना दिले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार श्री.रमेश अप्पा कराड जी व जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे यांची उपस्थिती होती.

#शेतकरी  #अतिवृष्टी #अन्नत्याग_आंदोलन 
#लातूर #नुकसान_भरपाई #७२_तास #अल्टिमेटम #Latur #BJP #BJPWithFarmers

शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर; बाधितांपर्यंत तात्काळ मदत पोहोचवा – मंत्री विजय वडेट्टीवार
राज्यात उद्यापासून मिशन कवच कुंडल अभियान

No comments:

Post a Comment